spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कृषी विभागामार्फत ‘महाविस्तार एआय’अँप   शेतकऱ्यांसाठी डिजिटल सेवा

यवतमाळ :- कृषि विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित महाविस्तार एआय हे अत्याधुनिक मोबाईल अॅप विकसित करण्यात आले असून सदर अॅप शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण डिजिटल व्यासपीठ ठरणार आहे. डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जीवनमान अधिक सुलभ करणे व शेती अधिक फायदेशीर बनविणे हा या अॅपचा मुख्य उद्देश आहे.

महाविस्तार एआय हे अत्याधुनिक मोबाईल अॅप कार्यान्वित केले आहे. डिजीटल तंत्रज्ञानाचा वापर करून शेतक-यांचे जीवनमान अधिक सुलभ आणि शेती अधिक फायदेशीर करण्याच्या उद्देशाने हे अॅप तयार करण्यात आले आहे.

हे अॅप शेतक-यांसाठी डिजीटल क्रांती असुन या तंत्रज्ञानाचा वापर जास्तीत जास्त शेतक-यांसाठी डिजीटल क्रांती असुन या तंत्रज्ञानाचा वापर जास्तीत जास्त शेतक-यांनी करावा. शेतक-यांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी एकाच ठिकाणी सर्व माहिती उपलब्ध करुन देते. प्रामुख्याने पेरणीच्या पध्दती खतांचा वापर कसा करावा, पाणी व्यवस्थापन आणि पीक संरक्षणाबद्दल वेळेवर माहिती मिळणार आहे.

शेतीसाठी आवश्यक रिअल टाईम, हवामान अंदाज, कृषी हवामान सल्ला, राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील शेतमालाचे बाजारभाव, पिकावरील कीड रोगांची माहिती, व त्यांच्या नियंत्रणाठीचे सोपे उपाय, कृषि विभागाच्या विविध शासकीय योजनांची माहिती, अर्ज करण्याची प्रक्रिया अॅपव्दारे इतर शेतक-यांशी आणि कृषीतज्ज्ञांशी जोडले जाण्याची सोय होणार असून यातून शेतकरी समुदाय निर्माण होणार आहे. जेणेकरुन त्यांना योग्य निर्णय घेता येईल आणि शेती उत्पादनात वाढ करता येईल. अशी या अॅपची प्रमुख वैशिष्टये आहेत.

महाविस्तार एआ हे अॅप शेतकऱ्यांसाठी एक डिजिटल क्रांती असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी जे. आर. राठोड यांनी केले आहे.

Popular Articles