spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

संचालक माहिती नागपूर कार्यालयात सहायक संचालक पदी अपर्णा यावलकर रुजू

नागपूर :-  माहिती व जनसंपर्क विभागाच्या नागपूर येथील संचालक माहिती कार्यालयात सहाय्यक संचालक या पदावर श्रीमती अपर्णा यावलकर यांची बदली झाली असून त्यांनी आज नव्या पदाची सूत्रे स्वीकारली आहेत.

माहिती व जनसंपर्क विभागातील संचालक (माहिती) या कार्यालयातील सहायक संचालक पल्लवी धारव यांची जिल्हा माहिती कार्यालय नागपूर येथे माहिती अधिकारी या पदावर बदली झाल्याने येथील सहायक संचालक पदावर अपर्णा यावलकर यांची अमरावती येथून बदली झाली आहे.

नागपूर व अमरावती विभागाचे माहिती संचालक डॉ. गणेश मुळे यांनी सहायक संचालक अपर्णा यावलकर व या कार्यालयातून बदली झालेल्या पल्लवी धारव यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.

यावेळी संचालक कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Popular Articles