spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

101 किलो उपवासाचा साबुदाणा व मठ्ठ्याचे भाविक भक्तांना वितरण, अकराव्या वर्षीही चाचेर येथील सामाजिक कार्यकर्ते मल्लू गडे यांच्या प्रेरणादायी उपक्रम

किशोर साहू, मौदा :- दरवर्षीप्रमाणे यंदाही चाचेर येथील श्री शंकर देवस्थान मंदिर व समस्त ग्रामवासी यांच्या सौजन्याने नुकताच अखंड श्रीमद् भागवत व शिवपुराणकथा ज्ञानयज्ञ सप्ताह थाटात साजरा करण्यात आला. त्यानिमित्य रामधून सह गावातील मुख्य रस्त्यांमधून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत सहभागी भाविकभक्तांसाठी गावातीलच राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून ठिकठिकाणी शरबत व अल्पोहाराची व्यवस्था करण्यात आली होती.

मागील दहा वर्षाप्रमाणे यंदा अकराव्या वर्षीही चाचेर बसस्थानक परिसरातील हनुमान मूर्ती समोरील गडे ट्रॅक्टर स्पेअर पार्ट अँड रिपेरिंग सेंटरचे प्रोप्रीएटर तथा सामाजिक कार्यकर्ते मल्लू गडे यांनी शोभायात्रेत सहभागी भाविक भक्तांसाठी 101 किलोच्या उपवासाच्या साबुदाणा मठ्ठ्यासह काँग्रेसचे भावी जि प चे उमेदवार मदन बरबटे यांच्या कॉम्प्लेक्स मध्ये भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ न देता सर्व सोयी सुविधेसह अल्पोहार उपलब्ध करून दिल्याबद्दल यंदा अकराव्या वर्षीही सर्व शेकडो भाविक मंडळींनी मल्लू गडे यांच्या या प्रेरणादायी उपक्रमाचे आभार मानत कौतुकही केले आहे.

मल्लू गडे यांच्या या सामाजिक कार्यात त्यांचे सहकारी गजानन दोडके, निकेश वैद्य ,पुरुषोत्तम गडे, निखिल झलके, तन्मय निकले ,सत्तार मिस्त्री ,मयूर गडे, विक्रम गजबे ,सतीश दादुरे यांनी परिश्रम घेतले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.