Home Latest News ख्वाजा गरीब नवाज उर्स निमित्त ७१ लिटर खीर वाटप व देशासाठी विशेष...

ख्वाजा गरीब नवाज उर्स निमित्त ७१ लिटर खीर वाटप व देशासाठी विशेष प्रार्थना

0
52

खापा :- राजस्थान येथे अजमेर शहरात स्थित सुफी संत ख्वाजा गरीब नवाज यांचा ८१४ वा उर्स खापा शहरात आनंदात साजरा करण्यात आला. या निमित्ताने शुक्रवारी ( दि. २६ डिसेंबर) खापा मस्जिद मध्ये फातेहा व मिलाद शरीफ चे आयोजन करण्यात आले होते. नंतर शनिवार (दि. २७ डिसें) रोजी बाजार चौक येथे स्थित वाड्यातील मदार शाहा बाबांच्या निंबाच्या झाडाखाली सायंकाळी ख्वाजा गरीब नवाज उर्स निमित्त ७१ लिटर खिरचे शहरातील सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना वाटप करण्यात आले. या निमित्ताने देशासाठी शांतता व देश हितासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली.

आयोजनाकरिता नवनियुक्त नगराध्यक्ष पियुष बुरडे, इमरान अली सय्यद, युनुस कुरेशी, मस्तान कुरेशी, सईद कुरेशी, अश्फाक कुरेशी, वसीम (गोलू) शेख, मकसूद शेख, समशेर कुरेशी, इमरान शेख लाईनमेन, आशिष निस्ताने, मोहसीन पठाण, शकील कुरेशी, रमजान कुरेशी, कुद्दुस कुरेशी, मेहबूब शेख यांच्यासह हाजी बाबा उर्स कमिटीचे सर्व सदस्य व समाज बांधवांनी सहकार्य केले.