spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

अतिवृष्टी मदतीचे गतीने वितरण सुरू

– संबंधित शेतकरी बांधवांनी तलाठ्यांना आवश्यक माहिती द्यावी, जिल्हा प्रशासनाचे आवाहन

यवतमाळ :- अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेती नुकसानीबद्दल शेतकरी बांधवांना मदतीचे वितरण जिल्ह्यात गतीने होत असून, तांत्रिक त्रुटीमुळे मदत मिळाली नसेल तर संबंधित शेतकरी बांधवांनी तत्काळ तलाठी, कृषी सहायक यांच्याकडे तत्काळ माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे जून ते ऑगस्ट या कालावधीत 2 लक्ष 10 हजार 976.58 हे.आर क्षेत्रात शेती पिकाचे नुकसान झाले असून, 2 लक्ष 13 हजार 722 शेतकरी बाधित झाले. त्यासाठी शासन स्तरावरून शा. नि. दि. 23 सप्टेंबर 2025 नुसार 183 कोटी 67 लक्ष 82 ह. इतका निधी मंजूर झाला आहे.

ई-पंचनामा पोर्टलवर 1 लक्ष 84 हजार 661 बाधित शेतक-यांच्या याद्या अपलोड झाल्या असून त्याची टक्केवारी 86 टक्के आहे व आतापर्यंत 1 लक्ष 45 हजार 395 बाधित शेतक-यांच्या खात्यात 115 कोटी 80 लक्ष 7 ह. इतका निधी डीबीटी द्वारे जमा करण्यात आलेला आहे.

सप्टेंबर 2025 मध्ये अतिवृष्टी व पुरामुळे 3 लक्ष 73 हजार 552.86 हे. आर शेती पिकाचे नुकसान झाले असून, बाधित शेतकरी संख्या 2 लक्ष 58 हजार 868 इतकी आहे. याकरिता शासन स्तरावरून शा. नि. 18 ऑक्टोबर 2025 नुसार 262 कोटी 8 लक्ष 45 ह. इतका निधी मंजूर झालेला आहे. आतापर्यंत 1 लक्ष 69 हजार 744 बाधित शेतक-यांच्या याद्या ई- पंचनामा पोर्टलवर अपलोड करण्यात आलेल्या आहेत. त्यात जिल्ह्याची टक्केवारी 78 टक्के आहे. त्याचप्रमाणे, 1 लक्ष 15 हजार 761 बाधित शेतकरी यांचे खात्यात 126 कोटी 9 लक्ष 85 ह. इतका निधी डीबीटीद्वारे जमा करण्यात आलेला आहे.

मयत शेतकरी, वारसांचे संमतीपत्र न मिळणे, बाधित शेतकरी यांनी खाते क्रमांकाची माहिती तलाठी, कृषी सहाय्यक यांच्याकडे जमा न करणे यामुळे संबंधित बाधित शेतकरी यांचे वाटप प्रलंबित आहेत. तलाठी / कृषी सहाय्यक यांच्याकडे तात्काळ माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.