नागपूर :- नागपूरचे ख्यातनाम कलाकार प्रसाद व्ही इंगळे यांना मुंबई स्थित बंगिया कला केंद्र आयोजित कार्यक्रमात “पुणे आर्ट फिएस्टा 2025 ” मध्ये कला श्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ही कला प्रदर्शनी नुकतीच संपन्न झाली असून बालगंधर्व कला दालन पुणे येथे पार पडली. या उत्सवात देशभरातील कलाकारांच्या उत्कृष्ट कलाकृतींचे प्रदर्शन करण्यात आले होते. प्रसाद व्ही इंगळे यांच्या कलाकृतींना जे की ” WIRE ART होते त्याने परीक्षक मंडळ तसेच उपस्थित प्रेक्षकांकडूनही विशेष प्रतिसाद मिळाला. त्यांच्या सर्जनशील अभिव्यक्तीशील कलाकृतीच्या माध्यमातून त्यांना आधुनिक कला क्षेत्रात कलाक्षेत्रात आपला ठसा उमटवला असून त्याबद्दल त्यांना कला श्री पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा सन्मान नागपूर तसेच विदर्भातील सर्व कला प्रेमींसाठी अभिमानाचा क्षण आहे. ज्यातून या प्रदेशातील कलाकारांची राष्ट्रीय पातळीवरील उपस्थिती अधिक बळकट होत आहे.




