नागपूर २९ : हजरत बाबा ताजुद्दीन (रह.) यांच्या १०३ व्या वार्षिक उर्सानिमित्त, शादाब एज्युकेशन सोसायटी संचालित हजरत बाबा ताजुद्दीन कला आणि वाणिज्य महाविद्यालयाने ताजाबाद शरीफ येथे लंगर (भोजन) कार्यक्रमाचे आयोजन केले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष हाजी अब्दुल सलीम अब्दुल जब्बार, सचिव हाजी मोहम्मद शादाब अब्दुल सलीम यांच्यासह संस्थेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अब्दुल शकील अब्दुल सत्तार, तसेच प्रा. डॉ. विरेन्द्र आदमने, प्रा. डॉ. साधना जाधव, डॉ. सुभाष धोटे, प्रा. डॉ. सुरेश काळे, प्रा. डॉ. मिनाक्षी इंगळे, प्रा. डॉ. विनोद शेंडे, नंदलाल शर्मा, शादाब खान, कुमेश बिहार, प्रमोद झोडे, मार्तंड गोंडाने, नियाज़ अली, प्रकाश मेश्राम आणि गणेश राजपूत यांनी या कार्यक्रमासाठी सहकार्य केले.




