तिरोडा :- सेवा पंधरवडा टप्पा दुसरा – ‘सर्वांसाठी घरे ‘ अंतर्गत कोयलारी येथे ग्रामपंचायत कार्यालयात उपजिल्हाधिकारी मुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली भूमी अभिलेख कार्यालय महसूल कार्यालय व पंचायत समिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामीत्व योजनेअंतर्गत ड्रोन द्वारे मोजणी केलेल्या मिळकतीचे सनद वाटप शिबिर घेण्यात आले. सदर कार्यक्रमात कोयलारीचे सरपंच रंजित वालदे, उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड ,तहसीलदार नारायण ठाकरे, मंडळ अधिकारी शालू रहांगडाले, ग्रा. महसूल अधिकारी, संजय वाकरकर, पोलीस पाटील, रंजित हटवार तसेच ग्रामस्थ त्या संख्येत उपस्थित होते. या कार्यक्रमात लाभार्थ्यांना सनद वाटप करण्यात आली.



