spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

तेंदुपत्ता संकलकांना मुखवट्याचे वितरण

प्रतिनिधी सचिन चौरसिया,रामटेक :- महाराष्ट्र शासनाचे “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व आयोजित समाधान शिबिरामध्ये पवनी (प्रादेशिक ) वनपरिक्षेत्राच्या वतीने ग्रामस्थांच्या विविध समस्यांचे निराकरण करून मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी घ्यावयाच्या खबरदारीबाबत नागरिकांना सविस्तर मार्गदर्शन करून जनजागृती करण्यात आली व राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचे प्रमुख उपस्थितीत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांच्या बचावासाठी तेंदूपत्ता संकलकांना मुखवट्याचे (मास्क) वितरण करण्यात आले. वनपरिक्षेत्र पवनी (प्रादेशिक) अंतर्गत येणाऱ्या तेंदूपत्ता संकलनाच्या काळात मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागातील नागरिक जंगलात प्रवेश करतात. या कालावधीत वन्यप्राण्यांची हालचाल वाढलेली असते. त्यामुळे जंगलात काम करताना सुरक्षिततेचे नियम काटेकोरपणे पाळणे अत्यंत आवश्यक असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले. सकाळी आठच्या अगोदर आणि सायंकाळी चार नंतर जंगलात जाणे टाळणे, मोबाईल वर गाणे वाजवत जंगलात जाणे, एकट्याने जंगलात न जाता समूहाने जाणे, गटाने तेंदूपत्ता संकलन करणे, वन्यप्राण्यांच्या हालचाली आढळल्यास सुरक्षित अंतर राखणे तसेच तात्काळ वन विभागाशी संपर्क साधणे, अशा विविध सूचना उपस्थित ग्रामस्थांना यावेळी देण्यात आल्या.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.