सचिन चौरसिया, रामटेक :- रामटेक-मौदा मार्गावरील श्री शनिदेव मंदिरात श्री संकट मोचन शनिदेव सेवा समितीच्या वतीने दोन दिवसीय श्री शनी जयंती महोत्सव १५ व १६ मे रोजी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेतला. शुक्रवार सायंकाळी ६ वाजता हरीओम बाल भजन मंडळ, रामटेकचे अशोकराव हांडे, यांचा भजन कार्यक्रम भक्तिभावात रंगला. शनिवार सकाळी ८ वाजता अभिषेक करण्यात आला. सकाळी १०.३० वाजता सार्वजनिक हवन विधी आणि सायंकाळी ६ वाजता महाआरतीचे झाली. आयोजन करण्यात आले होते. माजी आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी, नगराध्यक्ष बिकेंद्र महाजन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यानंतर भजन, मधुरम सुगम संगीत कार्यक्रमानंतर महाप्रसाद वितरित करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समितीचे अध्यक्ष खेमराज इखार, उपाध्यक्ष राजकुमार गायकवाड, सचिव सुरेश चव्हाण, शशिकांत कारामोरे, प्राचार्य अविनाश श्रीखंडे, डॉ. राजेश ठाकरे, डॉ. विनायक भिवगडे, दयाल रोकडे, राजू कापसे यांच्यासह कार्यकारिणी सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
रामटेक येथे श्री शनी जयंती महोत्सव
Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.