Home Latest News जिल्हाधिकारी यांनी सिटू च्या आशा वर्कर यांना दिले सकारात्मक आश्वासन 

जिल्हाधिकारी यांनी सिटू च्या आशा वर्कर यांना दिले सकारात्मक आश्वासन 

0
37

– कार्यक्षेत्राशिवाय बीएलओ चे काम न देण्याचा घेतला निर्णय

नागपूर :- आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन (सीआयटीयु) नागपूर जिल्हा तर्फे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना बी एल ओ चे काम आशा वर्कर करणार नाही. या विषयावर कॉ.राजेंद्र साठे यांचे नेतृत्वात शिष्टमंडळाने भेट घेतली. शिष्टमंडळात अंजु चोपडे, आरती चांभारे, गीता मेश्राम उपस्थित होते. आशा वर्कर यांच्यावर आरोग्य विभागाचे महत्त्वाचे काम असून ऑनलाईन व ऑफलाईन काम करावे लागत आहे. विविध लसीकरण विविध सर्वे करण्यासोबतच एचपीव्ही व्यक्सीन ची मोठी जिम्मेदारी त्यांच्यावर देण्यात आलेली आहे. सप्टेंबर महिन्यापासून केंद्राचे कोणते मानधन मिळाले नसून कामाच्या इतर मोबदला सुद्धा त्यांना मिळालेल्या नाही कामाच्या वाढत्या व्यापामुळे विविध रोग राहणे आशा वर्कर प्रस्तावत असून वेळेवर न मिळणाऱ्या व अल्पमानदानामुळे त्यांची आर्थिक स्थिती भयावह होत चाललेली आहे. अशा परिस्थितीमध्ये बी एल ओ चे काम आशा वर्कर यांचे वर झोपून तीन ते चार किलोमीटर अधिक अंतरावर जाऊन अनोळख्या भागात काम करणे शक्य नाही. अधिकाऱ्यांचे रात्री उशिरा फोन येणे सुखाची धमकी देणे कार्यमुक्त करण्याची धमकी देणे असे प्रकार घडत असल्यामुळे जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन काम करणार नाही अशी भूमिका आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन (सि आय टी यु) तर्फे घेण्यात आली. त्यावर चर्चा करताना आशा वर्कर यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातीलच काम देण्यात येत असेल तर त्या काम करणार. अन्यथा बीएलओ चे काम करणार नाही. अशी भूमिका युनियन तर्फे घेण्यात आली. त्यावर चर्चा करताना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी त्वरित आदेश काढून आशा वर्कर यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातीलच बीएलओ चे काम देण्यात यावे अशी सकारात्मक भूमिका घेतली. त्यावर जिल्हाध्यक्ष कॉ. राजेंद्र साठे यांनी आभार मानून त्वरित आशा वर्कर बाबत सकारात्मक निर्णय घेण्याबाबत त्यांचे अभिनंदन केले.