spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

‘अरुणोदय’ अभियानाचा नांझा येथून जिल्हास्तरीय शुभारंभ

यवतमाळ :- जिल्ह्यात सिकलसेल ॲनिमिया या आनुवंशिक आजाराच्या उच्चाटनासाठी व जनजागृतीसाठी आरोग्य विभागातर्फे ‘अरुणोदय सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियान’ १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी या कालावधीत राबविण्यात येत आहे. या अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ आयुष्मान आरोग्य मंदिर, नांझा ता. कळंब येथे उत्साहात पार पडला.

अभियानाचे उद्घाटन नांझा ग्रामपंचायतीच्या सरपंच रेखाताई हसतबांधे, यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष ढोले होते. यावेळी डॉ. क्रांतीकुमार नावंदीकर, डॉ. नितेश उपाध्याय, डॉ. मधुकर मडावी, डॉ. रामटेके यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना डॉ. सुभाष ढोले यांनी सिकलसेल हा आनुवंशिक आजार असून वेळेवर तपासणी व उपचार केल्यास त्यावर नियंत्रण शक्य असल्याचे सांगितले. डॉ. नितेश उपाध्याय यांनी माता व बालकांमधील सिकलसेल निदानाचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमादरम्यान जनजागृती करण्यात आली असून विद्यार्थ्यांच्या माध्यमातून रॅली काढण्याचे नियोजन करण्यात आले. या अभियानात नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी होऊन तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.

Popular Articles