spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

जिल्हास्तरीय क्रीडास्पर्धेत जि. प.शाळा वाकेश्वरला कबड्डी आणि कुस्तीचे प्रथम विजेतेपद

किशोर साहू, मौदा, ता.२४ :- जिल्हा परिषद अंतर्गत आयोजित जिल्हा शालेय क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धा महोत्सव १९ व २० जानेवारी २०२६ डब्ल्यूसीएल मैदान, चनकापूर, ता.सावनेर जि. नागपूर येथे पार पडला. या स्पर्धेत मौदा तालुक्यातील कोदामेंढी केंद्रातील जि.प.उच्च प्राथ.शाळा वाकेश्वर ने कबड्डी आणि कुस्ती मध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करून जिल्हास्तरीय प्रथम विजेतेपद मिळविले.

या महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे सीईओ विनायक महामुनी यांच्या हस्ते झाले. स्पर्धेत जिल्ह्यातील १३ तालुक्यातील संघ आणि स्पर्धकांनी सहभाग घेतलेला होता. स्पर्धेत अत्यंत चुरस बघायला मिळाली. या स्पर्धेत कनिष्ठ गट मुली कबड्डी मध्ये जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वाकेश्वर संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत प्रथम विजेतेपद व चषक पटकाविले.त्याचप्रमाणे कुस्ती मुली २४ किलो वजनी गट या क्रीडा प्रकारात आराध्या दिनेश सपाटे हिने प्रथम क्रमांक पटकावून विजेतेपद मिळविले.

वाकेश्वर या छोट्याशा गावातील अवघ्या ९८ पटसंख्या असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांची ही नेत्रदिपक कामगिरी बघून सगळीकडे कौतुकांचा वर्षाव होत आहे.

या सर्व विद्यार्थ्यांच्या यशामध्ये मौदा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी संकेत मरसकोल्हे,विस्तार अधिकारी श्रीमती चामट, रामेश्वर भक्तवर्ती,केंद्रप्रमुख रुस्तम मोटघरे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष टिकाराम सपाटे तथा सर्व सदस्य,शाळेचे मुख्याध्यापक लोकेश मोथरकर,क्रीडाशिक्षक मंगेश भोंडे, विक्रम आकरे, कीर्ती परिहार, सी.एस.टेकाम तथा गावातील नागरिक व पालकांचे वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य लाभले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.