spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

यवतमाळात १६ऑगस्ट २०२६ रोजी जिल्हा स्तरीय योगासन स्पर्धेचे आयोजन

यवतमाळ :- महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशनच्या मान्यतेने यवतमाळ जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे ७ वी जिल्हा स्तरीय योगासन निवड चाचणी स्पर्धा रविवार, दिनांक १६ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा सकाळी ८:०० वाजता उबंटू इंग्लिश मीडियम स्कूल, जाम रोड, यवतमाळ येथे पार पडणार आहे. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात येणार आहे.

स्पर्धेसाठी वयोगटाची गणना १ जानेवारी २०२६ या कट-ऑफ तारखेनुसार करण्यात येणार असून, सब-जुनिअर (१० ते १४ वर्षे), जुनिअर (१४ ते १८ वर्षे), सिनिअर (१८ ते २८ वर्षे), सिनिअर ‘A’ (२८ ते ३५ वर्षे), सिनिअर ‘B’ (३५ ते ४५ वर्षे) व सिनिअर ‘C’ (४५ ते ५५ वर्षे) अशा विविध गटांमध्ये स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेमध्ये ट्रॅडिशनल योगासन, आर्टिस्टिक सिंगल, आर्टिस्टिक पेअर, रिदमिक पेअर, ट्रॅडिशनल ग्रुप आणि आर्टिस्टिक ग्रुप या प्रकारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, एका खेळाडूला आपल्या वयोगटातील सर्व प्रकारांत सहभाग घेण्याची संधी उपलब्ध आहे.

स्पर्धेसाठी प्रति इव्हेंट २०० रुपये प्रवेश शुल्क ठेवण्यात आले असून, आर्टिस्टिक पेअर व रिदमिक पेअर प्रकारांमध्ये दोन्ही खेळाडूंना स्वतंत्र शुल्क भरावे लागणार आहे. नोंदणीसाठी अंतिम तारीख १५ ऑगस्ट २०२६ असून सर्व इच्छुक खेळाडूंनी दिलेल्या लिंक वरून ( https://tinyurl.com/DistrictYogaChampionship2026 )ऑनलाइन पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे.

स्पर्धकांनी ओळख व वयाचा पुरावा (आधार कार्ड किंवा शासकीय ओळखपत्र), बोनाफाईड प्रमाणपत्र, वैद्यकीय प्रमाणपत्र प्रमाणपत्र या कागदपत्रांची ऑनलाइन नोंदणीसोबत अपलोड करणे तसेच स्पर्धेच्या दिवशी त्यांची हार्ड कॉपी सोबत आणणे बंधनकारक आहे.

स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी किंवा नोंदणी संदर्भात प्रेमदास पकडे (८६००८९१४११, ९५११७९६२३२),  रुपाली शिंदे (८६२३८६६३३३), सतीश उपरे (९५१८९०५५११), साहेबराव साखरे (८९८३६६४६९४) व क्रांती अलोणे (७३५०५०६९०८) यांच्याशी संपर्क साधावा.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त योगपटूंनी तसेच शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी होऊन आपल्या क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन करावे, असे आवाहन यवतमाळ जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे करण्यात आले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.