– डॉ हेडगेवार स्मारक समिती व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सेवा विभाग, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळी स्नेह मिलन दिनांक 22.10.2025 रोजी महर्षी व्यास सभागृह, रेशीम बाग, नागपूर येथे संपन्न झाले
कार्यक्रम, “दिशा ३०” च्या वर्ष २०१८ ते २०२५ पर्यंत च्या बॅचचे विद्यार्थी व पालक यांच्या उपस्थितीत, दोन सत्रातुन संपन्न झाला. स्नेहमिलनाला, प्रांत सहसंघचालक व डॉ हेडगेवार स्मारक समितीचे उपाध्यक्ष श्रीधरराव गाडगे, प्रांत सेवा प्रमुख सुनील मेहेर , महानगर सेवाप्रमुख हरिनारायण येवले , डॉ हेडगेवार स्मारक समितीचे पदाधिकारी, चैतन्य क्लासचे अमोल शेगोकर, विदर्भ प्रांत व नागपूर महानगर कार्यकारणी सदस्य, सेवा कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन तसेच प्रास्ताविक हरिनारायण येवले यांनी केले. विद्यार्थ्यांनी ‘ईतनी शक्ति हमें देना दाता’ गीत सादर केले.
उद्घाटन सत्रातुन श्रीधरराव गाडगे यांनी विद्यार्थी व पालकांसमोर डॉक्टर हेडगेवार यांचे जीवन चरित्र संक्षिप्त स्वरूपातून मांडताना, भारत वर्षात अनेक अनेक थोर पुरुष होऊन गेले ज्यांचे विचार आजही भारत मनावर स्पष्ट जाणवतात. डॉक्टरांचे जीवनात अत्यंत दयनीय आर्थिक परिस्थिती, बारा वर्षाचे असताना आई-वडिलांचे प्लेग आजाराने एकाच दिवशी छत्र हरपले. ‘वंदे मातरम’ जयघोष केल्याची शिक्षा म्हणून शाळेतून काढून टाकल्यानंतर, यवतमाळ येथून ११ पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
कलकत्त्याला जाऊन डॉक्टर झाले, त्यांची वैद्यकीय व्यवसायात कधीही रुची नव्हती. देश स्वतंत्र का नाही ? तो का पारतंत्र्यात गेला? तो पुन्हा पारतंत्र्यात जाणार नाही. याची खात्रीपूर्वक व्यवस्था या चिंतनातुन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अशा वृक्षाची निर्मिती केली त्याचा आज वटवृक्ष झाला आहे. आज शतकपूर्ती वर्ष साजरे होत आहे.
संघ, कोणा करता काही देताना, उपकार म्हणून कधीच देत नाही तर आज घेणारा हा देणारा कसा होईल, त्याचा पूर्ण विकास होण्यासाठी पारिवारीक, सामाजिक जीवनात तो स्वाभिमानाने कसा उभा राहील याचे चिंतन करीत असतो.
‘देश हमे देता है सब कुछ, हम भी तो कुछ देना सीखे।।’
दुसऱ्या सत्रात चार गटांमधून मार्गदर्शन व अनुभव कथन, चर्चा सत्र झाले. नंतर विद्यार्थ्यांना मिठाईचे व भेटवस्तुचे वितरण झाले व भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.




