किशोर साहू, मौदा ,ता. २४ :- दसरा उत्सव समिती चाचेर तर्फे दसरा उत्सव समारोह सोहळा व रावण दहन कार्यक्रमानिमित्त काढलेल्या झाकीचे व दांडपट्ट्याचे बक्षीस वितरण दिवाळी पंचमीच्या शुभ मुहूर्तावर करण्यात आले.
झाकीचे 35,001 रुपयाचे प्रथम पारितोषिक शुभवी ट्रेडिंग चे प्रो. अतुल वानखेडे यांच्याकडून, 25,001 रुपयाचे दुसरे पारितोषिक नवेगाव येथील अल्ट्राटेक सिमेंट कंपनी व माजी जि प सदस्य कैलास बरबटे यांच्याकडून, 20,001 रुपयाचे तिसरे पारितोषिक ग्रा प खंडाळा (गांगणेर) चे तडफदार सरपंच संकेत झाडे व कृष्णा रेड्डी यांच्याकडून,17,001 रुपयाचे चतुर्थ पारितोषिक पान पॅलेस संघटना व माजी उपसभापती खेमराज चाफले यांच्याकडून, 15,001 रुपयाचे पाचवे पारितोषिक योगेश राईस मिलचे प्रो.योगेश दराडे यांच्याकडून,12,001 रुपयाचे सहावे पारितोषिक एनपीजी ॲग्रोटेक नागपूर प्रो. निशांत बरबटे, ग्रा प निसतखेडा माजी सरपंच रजत महादुले, भाजपा महामंत्री कैलास सोमनाथे यांच्याकडून ,10,001 रुपयाचे सातवे पारितोषिक धर्मराज बावनकुळे डॉ. दिनेश बादुले, राहुल बावणे यांच्याकडून,8,001 रुपयाचे आठवे पारितोषिक तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश काळे, भोला बावनकुळे ,पोलीस पाटील ज्ञानेश्वर नाकाडे, माजी सरपंच महेश कलारे यांच्याकडून ,6,001 रुपयाचे नववे पारितोषिक भाजपा तालुकाध्यक्ष रामटेक मंडळ रवी चव्हाण व आष्टी येथील सुरेश भिलकर यांच्याकडून, 5,001 रुपयाचे दहावे पारितोषिक पी एम श्री शाळा व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जीवन सहारे यांच्याकडून, दानपट्ट्याचे 10,001 रुपयाचे प्रथम पारितोषिक भाजयूमो जिल्हा उपाध्यक्ष संजूदादा वाघमारे व बाबदेव येथील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण कारेमोरे यांच्याकडून, 7,001 रुपयाचे द्वितीय पारितोषिक ग्रा प सदस्यगण रवींद्र ठाकरे ,शैलेश कोपरकर, प्रकाश वाकलपुडी ,सुरेंद्र टेंभरे ,योगेश निनावे यांच्याकडून ,5001 रुपयाचे तृतीय पारितोषिक परमात्मा एक रिवाइंडिंग वर्क्स ग्रुप प्रो. महेश टिकले यांच्याकडून वितरित करण्यात आले.
यशस्वीतेसाठी दसरा उत्सव समितीचे पदाधिकारी डॉ .दिनेश कोपरकर, भोजराज बावणे, प्रेमदास बावनकुळे, जीवन सहारे, नितीन नागमोते, विकी खंडाईत ,वैभव गेडाम, लकी महादुले, अक्षय सोमनाथे , हर्षद बावणे ,ऋषी बावणे, रतन कुंभरे, अंकित यादव, कैलास सोमनाथे सह समस्त सदस्य गणांनी व ग्रामस्थांनी सहकार्य केले.




