spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

प्रेमात अमीशाला बळी पडून जीवन खराब करू नका – धनश्री पाटनकर

– दामिनी पथकाची ज्ञानदीप शाळेत भेट

सचिन चौरसिया, प्रतिनिधी रामटेक :- करवाही येथील ज्ञानदीप विद्यामंदिर येथे दामिनी पथकाने भेट देऊन विद्यार्थीनींशी संवाद साधला. प्रेमात अमीशाला बळी पडू नका अनेक मुले व मुली सुद्धा एकमेकांच्या अमीशला बळी पडतात. त्यात मुलींचे जीवन उधवस्त होते. मुले मुलींना वेगवेगळी अमीशे दाखवून मुलींना पळवून नेतात. व त्याचे काही कारणास्तव पटले नाही तर त्यांचा शेवट हा वाईट होतो यासारखी अनेक उदाहरने त्यांनी दिली. मुलींना कोनताही छेडखानी केल्यास निसंकोचपणे कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता त्यांना पोलीसांत तक्रार करावी. याची माहिती गुप्त असते कोनत्याही मुलींचे नाव हे गुप्त ठेवल्या जाते त्यामुळे बिंधास्त पणे माहिती द्यावी अशी माहिती सहा. पोलीस निरिक्षक धनश्री कुटेमाटे पाटनकर यांनी दिली. ज्ञानदीप विद्यामंदीर करवाही येथे त्यानी आकस्मीक भेट दिली. त्या रामटेक तालुका दामिनी पथकाच्या प्रमुख आहेत तसेच त्यांनी बालकावरील होनाऱ्या अत्याचाराबाब विस्तृत माहिती दिली. यावेळी हवालदार विशाल इंगोले, शिपाई राजेश कुमरे यांनीही माहिती दिली. यावेळी शाळेचे मुख्याद्यापक केशव गोरडे, लुकेश चरडे, कैलास निघोट,सुभाष गायकवाड, महेंद्र ऊईके, नंदू मलघाटे,भोले साईलवार,रमला सिरसाम आदी उपस्थीत होते.

Popular Articles