spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कुणी घर देता का घर? पोलिसांची शोधाशोध ; दुरवस्था झाल्याने क्वार्टरमध्ये ओस

५६ पुराणे क्वार्टर पैकी एकही राहणे योग्य नाही

सचिन चौरसिया, रामटेक ८ :- पोलिसांच्या निवासस्थानांची दुरवस्था झाल्याने त्याचा वापर करणे गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे खासगी घरे भाड्याने घेतल्याशिवाय पोलिसांसमोर दुसरा पर्याय उरत नाही. भाड्याच्या घरचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पायपीट होत आहे. अशा परिस्थितीत शासकीय निवासस्थाने पोलिसांना कधी मिळणार? हा यक्ष प्रश्न अनेक वर्षांपासून उभा आहे. विशेष बाब म्हणजे रामटेक पोलिस स्टेशनची  स्थापना ब्रिटिश कालीन आहे. पोलीस स्टेशन समोर स्लबचे २० क्वॉर्टर तसेच अधिकार्‍यासाठी टीन शेडचे दोन बंगले आहेत. उपजिल्हा रुग्णालयासमोर तीन मंजिला इमारत मध्ये १६ क्वार्टर बांधले तसेच त्या परिसराला लागुण तीथेच जूने टीनाचे १८ क्वार्टर होते. परंतू ५६ क्वार्टर असून राहन्यायोग्य नाही.  निवासस्थानांची अवस्था दयनीय असल्याने ती राहण्यायोग्य नाहीत. त्यामुळे येथील पोलीस कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी हक्काची घरे मिळणार कधी, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. रामटेक तालुक्याचे विभाजन करून पारशिवनी व मौदा तालुक्याची निर्मिती करण्यात आली होती. वाढत्या लोकसंख्येमुळे पोलीस ठाण्यांचेही विभाजन करण्यात आले. सध्या रामटेक पोलीस ठाण्यात एकूण ७३ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी एक ही शासकीय निवासस्थानांची योग्य घरे नाहीत. पोलीस ठाण्यासमोरील २० निवासस्थानांमध्ये एक हॉल व एकस्वयंपाकघर असून, त्यात कर्मचाऱ्यांना कुटुंबासह वास्तव्य करण्या योग्य नाही. तिथेही सुविधांचा अभाव आहे. परिणामी पोलीस कर्मचाऱ्यांना शहरात भाड्याने घर घेऊन राहावे लागत आहे. ही समस्या नेमकी कधी सोडविली जाणार, यावर कुणीही बोलायला तयार नाही. इमारतीत सुविधांचा अभाव असून, देखभाल, दुरुस्ती व स्वच्छतेकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे त्या इमारत निरुपयोगी  आहे.

पर्यायी जागा उपलब्ध

रामटेक शहरात उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयदेखील आहे. त्यामुळे शहरात एक उपविभागीय पोलीस अधिकारी, एक पोलीस निरीक्षक, एक सहायक पोलीस निरीक्षक व चार पोलीस उपनिरीक्षक अशा सात अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र निवासस्थानांची आवश्यकता आहे.
रामटेक ठाण्यात महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचीही संख्या मोठी आहे. त्यामुळे त्यांनाही स्वतंत्र निवासस्थानांची आवश्यकता आहे. अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांसाठी तहसील कार्यालयासमोरील जागा योग्य आहे. तसेच उपजिल्हा रुग्णालयाजवळील तीन एकर जागा पोलीस विभागाच्या मालकीची आहे. या जागेवरही सुसज्ज पोलीस कॉलनी तयार होऊ शकते


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.