spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

भाऊजी दप्तरी इंग्लिश स्कूलला संगीत पारितोषिकासाठी देणगी

नागपूर :- विद्वद्रत्न डॉ. भाऊजी दप्तरी यांचे मानसपुत्र स्व. प्रा. विद्याधर व्यंकटेश वझलवार (शांतिनिकेतन) यांच्या स्मरणार्थ महालातील भाऊजी दप्तरी इंग्लिश स्कूलला 1 लाख रुपयांची देणगी देण्यात आली आहे.

वझलवारांच्या ज्येष्ठ कन्या गीता मुजुमदार यांनी आज या रकमेचा चेक शाळेचे संचालन करणाऱ्या भारतीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गजानन पिलपिले यांच्या सुपूर्द केला आणि वझलवार जन्मशताब्दी वर्षाचे स्मृतिचिन्हही भेट दिले. या देणगीच्या रकमेवरील व्याजातून दरवर्षी शाळेतील एका विद्यार्थ्याला संगीतात उत्कृष्ट ठरल्याबद्दल पारितोषिक दिले जाणार आहे. याप्रसंगी मुजुमदारांच्या भगिनी अरुंधती देशमुख, नात डॉ. मधुरा धोपावकर, ज्येष्ठ पत्रकार विनोद देशमुख या कुटुंबीयांसह शाळेच्या प्राचार्य जान्हवी ठेमदेव, शिक्षिका सारिका सातपैसे आदी उपस्थित होते.

Popular Articles