spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

डॉ. मिनल दवंडे यांना पीएचडी प्रदान

नागपूर :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामार्फत बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन आणि बिझनेस मॅनेजमेंट या विषयात  “Strategic Business Model to Generic Medicines – An Empirical Study (With Special Reference to Nagpur Region)” या संशोधन प्रबंधावर मिनल दवंडे यांनी पीएच. डी.पदवी प्राप्त केली आहे. नागपूर विभागातील जनरिक औषध व्यवसायाच्या संरचना, बाजारपेठेतील मागणी-पुरवठा, उद्योगांसाठी उपयुक्त धोरणात्मक मॉडेल्स यांचा त्यांनी अभ्यास करून महत्त्वपूर्ण निष्कर्ष प्रबंधातून मांडले आहेत. जनरिक मेडिसिन सेक्टरमध्ये टिकाऊ, परिणामकारक आणि ग्राहकाभिमुख व्यवसाय मॉडेल्स कसे उभारता येतात, यावर त्यांच्या संशोधनात ठोस दिशा देण्यात आली आहे. डॉ. मिनल दवंडे यांना डॉ. वैशाली रहाते यांचे मार्गदर्शन मिळाले. डॉ.मिनल दवंडे यांच्या या कर्तृत्वपूर्ण यशाबद्दल मार्गदर्शक प्राध्यापक, कुटुंबीय आणि सहकारी यांनी त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले असून पुढील संशोधन आणि अकादमिक क्षेत्रातील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Popular Articles