spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख जयंती उत्साहात साजरी

खापा :- स्थानिक जिजामाता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे देशाचे पहिले कृषिमंत्री शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख जयंती नुकतीच साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य सुधाकर गजभिये तर प्रमुख अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश रोकडे उपस्थित होते.

यानिमित्ताने विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी भाऊसाहेब देशमुख यांच्या जीवन कार्यावर आधारित प्रश्नमंजुषाचे आयोजन करण्यात आले. त्यात अ गट वर्ग पाच ते सात मधून प्रथम क्रमांक वर्ग सहावीतील रेश्मा खुबाळकर, चैतन्य बागडे, लावण्या यादवार तर ब गट वर्ग 8 ते 10 मधून प्रथम क्रमांक वर्ग दहावीतून साक्षी राक्षे, त्रिशा शेंडे, प्रिया येनूरकर यांनी पटकाविला. प्रश्नमंजुषाचे संचालन पल्लवी धुवाधप्पर व परीक्षक म्हणून राजेंद्र भोंगाडे व भाग्यश्री मायकरकर यांनी कार्य केले. कार्यक्रमाचे संयोजन भारती कुंमरे यांनी केले.

यावेळी कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जीवन कार्यावर आपल्या मार्गदर्शनातून प्रकाश टाकून त्यांच्या कृषी, शिक्षण व सामाजिक कार्याचा उहापोह केला. संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन वर्ग नववीची कोमल रोकडे तर आभार प्रदर्शन कुमारी क्रांती गावंडे यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.