खापा :- व्ही.एस.पी. एम. अकेडमी ऑफ हायर एज्युकेशन सोसायटी, नागपूर द्वारा संचालित महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय, सिरोंजी येथे शिक्षण महर्षि भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख यांची १२७ वी जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्राचार्य संदीप भोंडे होते. तर सामाजिक कार्यकर्ते सुरज निकोसे, संजय गिरमेकर, रविंद्र उईके, अस्मिता डहाट, लोहितकर प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते.
विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाबरोबर शील, चारित्र व संस्कार यांची रुजवणूक करणे फार गरजेचे आहे. त्यांच्या शिक्षणात ज्ञान व नैतिक मुल्यांचा सुरेख संगम असायला हवा, तेव्हाच त्यांचे जीवन समुद्ध होइल. या करीता थोर पुरुषांची जयंती, पुण्यतिथि साजरे करणे गरजेचे असते. असे विचार प्राचार्य भोंडे यांनी या प्रसंगी व्यक्त केले. या वेळी राष्ट्रसंत गाडगेबाबा व डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या भेटीचा प्रसंग नाटीके द्वारे सादर करण्यात आला. गाडगेबाबाचे भजन, शेतकरी नृत्य, प्रश्नमंजूषा यासारखे कार्यक्रम व्यासपीठावर प्राध्यापिका योगिता बुऱ्हाण यांच्या मार्गदर्शनात, पूजा दहीकर, बाबी पर्बत, जेष्ठ शिक्षक दुर्गेश्वर चौधरी, दिनेश हजारे , मुरलीधर तवले, प्रा. ज्ञानेश दळवी यांनी परिश्रम घेतले. तर शिक्षक दीपक नारे यांनी भाऊसाहेब देशमुखांची भूमिका पार पाडली. कार्यक्रमाचे संचालन प्रा. विजय काळमेघ तर, आभार प्रदर्शन शिक्षक रामकृष्ण टेकाडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्विते करीता शिक्षकेतर कर्मचारी मारोती सोमकुवर, गिता बाजनघाटे, शुभम चटकवार यांनी परिश्रम घेतले.




