पिपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटिक) नागपूर महापालिकेत पूर्ण ताकदनीशी रणांगणात…

0
61

– 22 उमेदवारांची जाहीरपणे घोषणा :

नागपूर :- जानेवारी २०२६ मध्ये होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीसाठी पीपीआयडी ने कंबर कसलेली आहे. पिपल्स पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष नवीन जरी असला तरी हा पक्ष ५० वर्षाच्या आंदोलनाचा परीणाम आहे. याला फुले- आंबेडकराईट आंदोलनाची पार्श्वभूमी आहे. पीपीआयडी हा राष्ट्रीय पक्ष असून नागपूरात होत असलेल्या स्थानिक निवडणुकीत १० प्रभागात ४० उमेदवार उतरवण्याची तयारी त्यांनी दाखवलेली आहे. त्यापैकी २२ नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे. या निवडणुकीत अनेक एससी एसटी ओबीसी मायनॉरिटी संगठना त्यांच्या समर्थनात उभ्या झाल्या आहेत. त्यात आक्रमण युवक संघठना, मुलनिवासी विद्यार्थी संघ, ओबीसी युथ फ्रंट, आदिवासी युवक संघठना सामील आहेत. अशी माहिती नागपूर जिल्हा प्रभारी (इंचार्ज) ओपूल तामगाडगे व राज्याध्यक्ष युथ विंग राहुल मडामे यांनी दिली. याप्रसंगी मुलनिवासी विद्यार्थी संघाचे प्रचारक ब्रिजेश खटाणा आक्रमणचे जिल्हाध्यक्ष विशाल बनसोड, आदिवासी युवक संघटनेचे अनिकेत कन्नाके व ओबीसी युथ फ्रंटचे निकेतन फुसे उपस्थित होते. जाहीर केलेल्या २२ नावांची लिस्ट खालील प्रमाणे आहे.

प्रभाग – ०२ रोहन उके, अश्विनी मेश्राम, प्रियंका सोरदे प्रभाग – ०५ निलेश सरोदे प्रभाग – ०६ प्रवीण अडकने प्रभाग – ०७ सुमित कोटांगले वैशाली चौरे ग्रीष्मा नारनवरे (एससी), प्रभाग – १३ गौरव सोनूने अभिजीत कोपरे (ओबीसी), प्रभाग – १७ ओपूल तामगाडगे, सोनाली पांडे, मुस्कान हिकरे (एससी) चेतन झलके, प्रभाग – २३ तुषार मेश्राम (एससी) नसीम आलम, प्रभाग – ३२ राणीबाई जामिनकर, सूरज पुराणिक, प्रभाग -३३ सचिन कुंभारे, शशांक वाघमारे, प्रभाग -३५ संदीप चव्हाण, अनिकेत कन्नाके, यांची नावे जाहीर झाले असून घोषित केल्या गेले आहे.