spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कामठी येथील ड्रॅगन पॅलेस विपश्यना मेडिटेशन सेन्टरतर्फे वर्ष २०२६ मधील ‘विपश्यना शिबीर’ वेळापत्रक जाहीर

– इच्छुकांना प्रवेशासाठी आवाहन

कामठी :- दादासाहेब कुंभारे परिसर, कामठी येथील सुप्रसिद्ध ड्रॅगन पॅलेस विपश्यना मेडिटेशन सेन्टरच्या वतीने वर्ष २०२६ या वर्षातील विविध विपश्यना ध्यान शिबिरांचे अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकात नवीन व जुन्या साधकांसाठी १० दिवसीय सामान्य शिबिरे, विशेष शिबिरे, सतिपट्ठान शिबिरे, तसेच किशोर व किशोरींसाठी विशेष लघु शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

विपश्यना ही आत्मनिरीक्षणाद्वारे आत्मशुद्धीची अत्यंत पुरातन आणि मानवी जीवनाला संतुलित करणारी साधना पद्धती आहे. भगवान गौतम बुद्धांनी २५०० वर्षांपूर्वी या पद्धतीचा पुनर्शोध लावून तिला ‘जीवन जगण्याची कला’ म्हणून सर्वसुलभ केले होते. आधुनिक काळात आचार्य श्री सत्य नारायण गोयन्काजी यांनी या परंपरेचा जगभर प्रसार केला. याच वैज्ञानिक व सांप्रदायिकतामुक्त पद्धतीचे प्रशिक्षण देण्यासाठी कामठी येथे वर्षभर विविध शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे.

१० दिवसीय सामान्य शिबिरांचे वेळापत्रक २०२६:

वर्ष २०२६ मध्ये होणाऱ्या १० दिवसीय शिबिरांच्या तारखा खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आणाऱ्या आहेत:

१४ ते २५ जून २०२६ | १ ते १२ जुलै २०२६ | १५ ते २६ जुलै २०२६

१ ते १२ ऑगस्ट २०२६ | १६ ते २७ ऑगस्ट २०२६ | २५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर २०२६

९ ते २० डिसेंबर २०२६

विशेष आणि जुन्या साधकांसाठीची शिबिरे:

जुन्या साधकांच्या साधनेतील प्रगतीसाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये १० दिवसीय विशेष शिबीर ३० सप्टेंबर ते ११ ऑक्टोबर २०२६ दरम्यान होईल (ज्यांनी किमान ५ सामान्य शिबिरे आणि १ सतिपट्ठान शिबीर पूर्ण केले आहे). याशिवाय जुन्या साधकांसाठी १ आणि ३ दिवसीय लघु शिबिरांचेही आयोजन करण्यात आले आहे.

युवकांसाठी किशोर व किशोरी शिबीर:

१५ ते १९ वयोगटातील किशोर व किशोरींसाठी विशेष ७ दिवसीय शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मुलांसाठी (किशोर) २० ते २८ मे २०२६ या कालावधीत शिबिरे आयोजित करण्यात आले होते.

आणि मुलींसाठी (किशोरी) १ ते ९ जून २०२६ या कालावधीत शिबीर सुरू आहेत. ज्यामुळे तरुण पिढीला मानसिक ताणतणावातून मुक्त होण्यास मदत लाभेल.

विपश्यनाच्या माध्यमातून सर्वश्रेष्ठ धम्मदान : ॲड. सुलेखा कुंभारे.

“मानवी मनाला निर्मळ करणारी आणि मानवाला सर्व दुःखांतून मुक्त करणारी विपश्यना ही भगवान बुद्धांनी जगाला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. कामठी येथील ड्रॅगन पॅलेस विपश्यना मेडिटेशन सेंटरच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही अमूल्य विद्या पोहोचवणे आणि त्यांच्या जीवनात सुख-शांतता निर्माण करणे, हेच खरे आणि सर्वश्रेष्ठ धम्मदान आहे,” असे प्रतिपादन ड्रॅगन पॅलेसच्या प्रमुख तथा माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखा  कुंभारे यांनी केले आहे.

Popular Articles