spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

शहरातील नाली बांधकाम निकृष्ट दर्जाचे

– अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष 

यासीन शेख, गोंदिया सडक अर्जुनी :- शहरातील वार्ड क्रमांक 17 मध्ये विशिष्ट नागरी सुविधा योजनेतून नाली बांधकाम करण्यात आले आहे मात्र शाखा अभियंता आशा डांगे यांचे दुलक्षित पणामुळे नाली बांधकाम करताना नाली बेस मोठे 80 एम एम बोल्डर फिलिंग न करता बांधकाम करीत आहेत. नाली बांधकाम सुरू असताना कोणताही जबाबदार अधिकारी उपस्थित न राहता बांधकाम केले जात आहे. सदर कामावर पाण्याची क्वरिंग करीत नाही. असे निकृष्ट दर्जाचे नाली बांधकाम सुरू आहे.

सडक अर्जुनी शहरात तीन कोटी रुपयांचे विकास कामे मंजूर झाली आहेत . त्या पैकी वार्ड क्रमांक 17 मधील एच अँड टी कॉलेज जवडील नाली बांधकाम सुरू आहे. कुठलेही बांधकाम सुरू करताना माहिती फलक लावायला पाहिजे पण ठेकेदाराचे बेजबाबदार पणामुळे कुठलेही फलक लावले नाही.

संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी प्रल्हाद खांडवाये यांनी लक्ष्य देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ता रोशन बडोले व वॉर्ड क्रमांक 17 चे नागरिकांनी केली आहे. सदर कामावर अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही तर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

Popular Articles