spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कामठी तालुक्यातील औषध विक्रेत्यांचा बंद यशस्वी

कामठी :- अखील भारतीय औषध विक्रेता संघटनेने बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री व कॉर्पोरेट द्वारे अव्यवसायिक स्पर्धेविरोधात काल 20 मे ला कामठी तालुक्यातील शहर ग्रामीण येथे औषध विक्रेत्यांनी दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळला व काळ्या फिती लावून निषेध केला. यात कामठी, कन्हान व भिलगाव च्या 231 औषध विक्रेत्यांनी 100 टक्के बंद पाळला. अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने ऑनलाईन औषध विक्री ई पोर्टल द्वारे होणारा औषध व्यापार तसेच जीएसआर 817 (ई) व 220(इ)संदर्भातील मुद्द्यावर शासनाने योग्य भूमिका घ्यावी अशी मागणी केली होती या विषयावर अनेक वेळा शासन व संबंधित अधिकाऱ्यांना निवेदने देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही त्यामुळे अखिल भारतीय स्तरावर बंदचे आवाहन करण्यात आले होते .त्यानुसार 20 मे ला कामठी तालुका औषधी विक्रेता संघटनेच्या वतीने बंद पाळत काळ्या फिती लावून निषेध केला.यावेळी संघटनेचे संजय खोब्रागडे, मनीष मेहाडिया, मनीष गुप्ता,रवी गोयल, रौसिफ अली, महेश लखोंटीया ,सुनील बिचपुरीया, अमर चावला, शाहिद भाई, वीर गेडाम,अकील भाई, फारूक भाई,फईम भाई, सतीश आदी उपस्थित होते.

Popular Articles