spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

विद्युत साहित्य व पेंट चोरी प्रकरण उघडकीस, दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

 

चंद्रपूर १२ : पडोली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील महाकाली नगरी परिसरात घराच्या बांधकामस्थळावरून पेंट व इलेक्ट्रिक साहित्य चोरीची घटना घडली होती. या चोरीमागील दोन आरोपींना पोलिसांनी तत्परतेने अटक करण्यात यश मिळवले आहे.

रामप्रवेश धीरज ठाकुर यांच्या नव्या घराच्या बांधकामस्थळावरून काही दिवसांपूर्वी पेंट व इलेक्ट्रिक साहित्य चोरीला गेले होते. याबाबत पडोली पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली होती. या तक्रारीनंतर पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन व अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली.

गुप्त माहितीनुसार, चोरीत सहभागी आरोपी दुर्गापूर परिसरात चोरीचे साहित्य विक्रीसाठी फिरत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करून शादाब शब्बीर सैफी आणि सोहेल कादिर सैय्यद या दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी चोरीची कबुली दिली. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली असून चोरीचे साहित्यही जप्त करण्यात आले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.