Related Posts

सामाजिक न्याय विभागाच्या वसतीगृहात सोयी सुविधा पुरविण्यावर भर देणार  – सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> आपल्या विभागाचे वसतिगृह अतिशय सुंदर व सुसज्ज असे आहे&period; प्रत्येक विद्यार्थी हा आपले करीअर घडविण्यासाठी येथे येत असतो&period; त्यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करुन देणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे&period; त्यामुळे वसतिगृहातील मुला मुलींना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यावर विशेष भर असतो&comma; असे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p>दीक्षाभूमी परीसरात सुरु असलेल्या संत चोखामेळा परीसरातील नवीन वसतिगृह बांधकामाचा मंत्री शिरसाट यांनी आढावा घेतला&period; संत चोखामेळा वसतिगृह परिसरातील इमारतीमध्ये नागपूर शहरातील मुलींचे सर्व वसतिगृह कायमस्वरुपी स्थलांतरीत करण्याच्या शासनाच्या आदेशान्वये सध्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह&comma; सतरंजीपुरा&comma; नागपूर हे वसतिगृह कार्यरत आहे&period; तसेच डॉ&period; बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह&comma; गड्डीगोदाम&comma; नागपूर हे वसतिगृह सद्यस्थितीत भाडेतत्वावरील इमारतीमध्ये कार्यरत आहे&period; गृहपाल यांच्या निवासाकरीता बांधण्यात आलेल्या स्टॉफ क्वार्टरचे बांधकाम पुर्ण झालेले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>उत्तर भागामध्ये बेसमेंट&comma; ग्राऊंड फ्लोअर व आठ माळयांचे बांधकाम करावयाचे असून त्यापैकी आठ माळयाचे स्लॅबचे आणि प्लास्टरचे बांधकाम पुर्ण झालेले आहे&period; इलेक्ट्रिक वायरींगचे आतील काम पुर्ण झालेले आहे&period; दरवाजाचे फ्रेम&comma; खिडक्यांची ग्रील&comma; पुटींग&comma; पेटींग आणि प्लबींगची कामे पुर्ण झालेली आहे&period; इमारतीचे बांधकाम पुर्ण झालेले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>दक्षिण विभागामध्ये बेसमेंट&comma; ग्राऊंड फ्लोअर व माळ्याचे स्लॅबचे व प्लास्टरचे बांधकाम पुर्ण झालेले आहे&period; दरवाजाचे फ्रेम&comma; खिडक्यांची ग्रील&comma; पुटींग&comma; पेटींग&comma; इलेक्ट्रिक आणि प्लबींगची कामे पूर्ण झाली&period; इमारतीचे बांधकाम पुर्ण झालेले आहे&comma; असे नागपूर महानगर प्रदेश प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी मंत्री महोदयांना सांगितले&period; विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या सर्व सोयी सुविधा या ठिकाणी उपलब्ध करुन दिल्या जात आहेत&period;<&sol;p>&NewLine;<p>तसेच डॉ&period; बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती निमित्त मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह वसंतनगर नागपूर येथे सिरसाट यांनी भेट दिली&period; वसतिगृहातील विद्यार्थीनींशी चर्चा केली&comma; त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला&period;<&sol;p>&NewLine;<p>यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव डॉ&period; हर्षवर्धन कांबळे&comma; सहआयुक्त &lpar;शिक्षण&rpar;&comma; समाज कल्याण आयुक्तालय प्रमोद जाधव&comma; प्रादेशिक उपायुक्त प्रसाद कुळकर्णी&comma; सहायक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे&comma; सहाय्यक आयुक्त चंद्रपूर विनोद मोहतुरे&comma; सहाय्यक आयुक्त गोंदिया किशोर भोयर&comma; नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;