Related Posts

नायलॉन मांज्यावर जिल्हयात कायमस्वरुपी बंदी

<p><strong>यवतमाळ &colon;-<&sol;strong> पक्षी&comma; मानव आणि पर्यावरणास होणारा गंभीर धोका लक्षात घेऊन&comma; जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी&comma; विकास मीना यांनी संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यामध्ये नायलॉन मांजा या नावाने परिचित असलेल्या प्लॅस्टिक किंवा कृत्रिम धाग्याच्या निर्मिती&comma; विक्री&comma; साठवणूक आणि वापरास कायमस्वरूपी बंदी घालण्याचा आदेश पारित केला आहे&period; हा आदेश पर्यावरण &lpar;संरक्षण&rpar; कायदा&comma; १९८६ च्या कलम ५ अन्वये तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>पतंग उडवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या नायलॉन मांजामुळे पक्षी आणि मानवांना तीव्र स्वरूपाच्या व काही प्रसंगी प्राणघातक इजा होत असल्याचे निदर्शनास आले आहे&period; विशेषतः मकरसंक्रांतीच्या सणादरम्यान याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो&period; या अविघटनशील धाग्यामुळे होणाऱ्या जीवितहानीला प्रतिबंध घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>हा मांजा लवकर विघटन न होण्याजोगा असल्याने गटारे&comma; नदी आणि नाल्यांसारख्या नैसर्गिक प्रवाहांमध्ये अडथळे निर्माण करतो&period; गायी आणि तत्सम प्राण्यांनी खाद्य म्हणून नायलॉन मांजाचे तुकडे सेवन केल्यास त्यांना गुदमरण्याचा त्रास होतो&period; यामुळे पशुधनाला धोका निर्माण होतो&comma; तसेच माती आणि पाण्याच्या गुणवत्तेची पातळी घसरते&period; विजेच्या तारांवर या धाग्यांच्या घर्षणामुळे ठिणग्या पडून आग लागणे&comma; वीजप्रवाह खंडित होणे&comma; उपकेंद्रे बंद पडणे आणि इलेक्ट्रिक उपकरणांना बाधा पोहोचणे असे अपघात घडतात&period;<&sol;p>&NewLine;<p>जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार&comma; नायलॉन मांजाची विक्री किंवा साठवणूक करणाऱ्या घाऊक व्यापारी&comma; किरकोळ व्यापारी तसेच साठवणूकदार यांच्यावरही जिल्ह्यात प्रतिबंध घालण्यात आले आहेत&period; सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कोणतीही व्यक्ती किवा संस्था पर्यावरण &lpar;संरक्षण&rpar; कायदा&comma; १९८६ चे कलम १५ नुसार शिक्षेस पात्र राहील&period;<&sol;p>&NewLine;<p>या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था व पोलीस विभागाने तात्काळ पथके गठीत करावीत&period; तसेच&comma; नायलॉन मांजाच्या वापराने होणाऱ्या अपघातांबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहीम राबवावी&comma; असे आदेश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिले आहे&period;<&sol;p>&NewLine;