Home Latest News गडचिरोली जिल्ह्यातील रोजगार वाढीस चालना मिळणार – कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता...

गडचिरोली जिल्ह्यातील रोजगार वाढीस चालना मिळणार – कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा

0

<p><strong>&&num;8211&semi; अल्पमुदतीचे अभ्यासक्रम हे बदलत्या काळाची आवश्यकता<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>गडचिरोलीत &OpenCurlyQuote;ट्रॅक्टर सर्विस मेकॅनिक’ प्रशिक्षण यशस्वी&semi; २५ युवकांना मिळाला थेट रोजगार<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>गडचिरोली &colon;-<&sol;strong> बदलत्या औद्योगिक व कृषी अर्थव्यवस्थेत युवकांना तात्काळ रोजगारक्षम बनविण्यासाठी अल्पमुदतीचे&comma; उद्योगाभिमुख अभ्यासक्रम ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे कौशल्य&comma; रोजगार&comma; उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले&period; गडचिरोली येथील क्रातीवीर बाबुराव शेडमाके शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था &lpar;आयटीआय&rpar; येथे राबविण्यात आलेल्या &OpenCurlyQuote;ट्रॅक्टर सर्विस मेकॅनिक’ या अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमातून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या २५ विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले&comma; त्या कार्यक्रमात ते दूरदृश्य प्रणाली द्वारे बोलत होते&period;<&sol;p>&NewLine;<p>हा नियुक्तीपत्र वितरण कार्यक्रम दूरदृश्य प्रणालीद्वारे पार पडला&period; यावेळी राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल&comma; व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालिका माधवी सरदेशमुख&comma; गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा&comma; राज्य नाविन्यता सोसायटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद माळी&comma; तसेच महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड कंपनीच्या कौशल्य विकास विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉन लुईस आदी मान्यवर उपस्थित होते&period;<img class&equals;"alignnone wp-image-26817 size-large" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2026&sol;01&sol;WhatsApp-Image-2026-01-01-at-5&period;56&period;37-PM&lowbar;1-1024x683&period;webp" alt&equals;"" width&equals;"696" height&equals;"464" &sol;><&sol;p>&NewLine;<p>मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली जिल्ह्यातील रोजगारनिर्मितीस गती मिळत असून&comma; येत्या पाच वर्षांत हा जिल्हा राज्यातील वेगाने विकसित होणाऱ्या जिल्ह्यांपैकी एक ठरेल&comma; असा विश्वासही मंत्री लोढा यांनी व्यक्त केला&period; गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिक युवकांना विकासप्रक्रियेचा थेट लाभ मिळावा&comma; यासाठी कौशल्यविकास विभाग वेगाने काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p>मंत्री लोढा पुढे म्हणाले की&comma; गडचिरोलीसारख्या दुर्गम व आदिवासीबहुल जिल्ह्यात युवकांना दीर्घकालीन शिक्षणाबरोबरच तात्काळ रोजगार देणारे अभ्यासक्रम आवश्यक आहेत&period; &OpenCurlyQuote;ट्रॅक्टर सर्विस मेकॅनिक’सारखे अल्पमुदतीचे अभ्यासक्रम युवकांना थेट उद्योगाशी जोडतात&period; लोहखनिज व इतर औद्योगिक गुंतवणुकीमुळे गडचिरोलीत मोठ्या प्रमाणावर उद्योग उभे राहत असून&comma; त्या पार्श्वभूमीवर कुशल मनुष्यबळ तयार करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले&period;<&sol;p>&NewLine;<p>मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी सांगितले की&comma; गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे&period; येथे सुरू असलेल्या मोठ्या औद्योगिक प्रकल्पांना गती देताना स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे&period; सामान्य नागरिकाला शासनाच्या सर्व सेवा व सुविधा सहज आणि सुलभपणे मिळाव्यात&comma; यासाठी प्रशासनाने संवेदनशीलपणे काम करावे&comma; असे त्यांनी नमूद केले&period; गडचिरोली जिल्ह्याच्या विकासकामांचा आढावा घेण्यासाठी दर महिन्याला जिल्ह्याला भेट देऊन कामकाजाचा आढावा घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले&period;<img class&equals;"alignnone wp-image-26818 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2026&sol;01&sol;WhatsAppImage2026-01-01at5&period;56&period;36PM1&lowbar;copy&lowbar;800x533&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"533" &sol;><&sol;p>&NewLine;<p><strong>स्थानिक युवकांसाठी कौशल्यवृद्धीवर भर &colon; जिल्हाधिकारी<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सांगितले की&comma; गडचिरोलीत येणाऱ्या गुंतवणुकीचा जास्तीत जास्त लाभ स्थानिक युवकांना मिळावा&comma; यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे&period; युवकांची कॅपॅसिटी बिल्डिंग वाढविण्यावर भर देण्यात येत असून&comma; विविध माध्यमांतून रोजगाराभिमुख प्रशिक्षण व कौशल्यविकास अभ्यासक्रम राबविण्यात येत आहेत&period; आयटीआय–उद्योग सहकार्याच्या माध्यमातून युवकांना थेट रोजगाराशी जोडण्याचा हा उपक्रम त्याचे उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p>औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सुरेश चौधरी यांनी प्रास्ताविकात माहिती देताना सांगितले की&comma; हा अभ्यासक्रम ८ ऑक्टोबर २०२५ ते १९ डिसेंबर २०२५ या कालावधीत राबविण्यात आला&period; एकूण ३९० तासांचे&comma; दररोज सहा तासांचे सघन प्रशिक्षण देण्यात आले&period; ट्रॅक्टर दुरुस्ती&comma; देखभाल व आधुनिक तांत्रिक प्रणालींचे प्रात्यक्षिक ज्ञान देण्यात आले&period; यात ३० प्रशिक्षणार्थ्यांपैकी २५ विद्यार्थी यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाले&period;<&sol;p>&NewLine;<p>कार्यक्रमात उत्तीर्ण प्रशिक्षणार्थी मयूर बुरले व संयोग कोहळे यांनी मनोगत व्यक्त केले&period; शेवटी कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेंद्र शेंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले&period;<&sol;p>&NewLine;<p>जिल्हा प्रशासनाने प्रशिक्षणार्थ्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली&comma; तर आयटीआय गडचिरोलीने निवासाची सोय उपलब्ध करून दिली&period; महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने प्रशिक्षणासाठी आवश्यक यंत्रसामग्री व तज्ज्ञ मार्गदर्शक उपलब्ध करून दिले&period;<&sol;p>&NewLine;<p>उपस्थितांचे आभार कौशल्य विकास चे सहाय्यक आयुक्त योगेंद्र शेंडे यांनी व्यक्त केले&period;<&sol;p>&NewLine;<p>याप्रसंगी कौशल्य विकास विभाग&comma; शासकीय औद्योगिक औद्योगिक प्रशिक्षण संस्था तसेच संबंधित विभागातील अधिकारी उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version