Home Latest News भंडाऱ्यात भीमा कोरेगाव शौर्य दिन उत्साहात साजरा, ५०० महार सैनिकांच्या पराक्रमाला ‘निळा...

भंडाऱ्यात भीमा कोरेगाव शौर्य दिन उत्साहात साजरा, ५०० महार सैनिकांच्या पराक्रमाला ‘निळा सलाम’

0

<p><strong>&&num;8211&semi; त्रिमूर्ती चौकात समता सैनिक दलाचे शिस्तबद्ध संचलन&semi; भव्य रॅली व संविधान वाचनाने परिसर दुमदुमला<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong> à¤¹à¤‚सराज&comma; प्रतिनिधी भंडारा &colon;-<&sol;strong> शहरातील त्रिमूर्ती चौक परिसरात १ जानेवारी रोजी &&num;8216&semi;भीमा कोरेगाव शौर्य दिन&&num;8217&semi; अत्यंत उत्साह&comma; शिस्त आणि स्वाभिमानाने साजरा करण्यात आला&period; समता सैनिक दल आणि इतर विविध सामाजिक संघटनांच्या वतीने आयोजित या सोहळ्यात १८१८ च्या ऐतिहासिक लढाईतील ५०० महार सैनिकांच्या अदम्य शौर्याला मानवंदना देण्यात आली&period; &period;<&sol;p>&NewLine;<p>कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ&period; बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली&period; या ऐतिहासिक दिनाचे औचित्य साधून समता सैनिक दलाच्या सैनिकांनी पांढऱ्या गणवेशात शिस्तबद्ध संचलन &lpar;मार्च पास्ट&rpar; केले&period; सैनिकांनी विजयस्तंभाच्या प्रतिकृतीला पुष्पहार अर्पण करून भीमा कोरेगावच्या शहिदांना मानवंदना दिली&period;<img class&equals;"alignnone wp-image-26823 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2026&sol;01&sol;1001932646&lowbar;copy&lowbar;800x590&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"590" &sol;><&sol;p>&NewLine;<p>याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना समता सैनिक दलाच्या प्रवक्त्यांनी भीमा कोरेगाव लढाईच्या इतिहासावर प्रकाश टाकला&period; ते म्हणाले की&comma; &&num;8220&semi;१ जानेवारी १८१८ चा विजय हा केवळ एका लष्करी तुकडीचा विजय नसून&comma; तो मानवी हक्कांच्या संघर्षाचा आणि शतकानुशतके लादलेल्या विषमतेविरुद्धच्या स्वाभिमानाचा विजय आहे&period; ५०० महार सैनिकांनी पेशवाईच्या अफाट सैन्याविरुद्ध दिलेला हा लढा आजही आपल्याला अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देतो&period; ही शौर्यगाथा आणि डॉ&period; बाबासाहेबांनी दिलेला हा वारसा पुढे नेणे ही काळाची गरज आहे&period;&&num;8221&semi;<&sol;p>&NewLine;<p>शौर्य दिनानिमित्त सामूहिक &&num;8216&semi;बुद्ध वंदना&&num;8217&semi; घेण्यात आली&period; त्यानंतर उपस्थित सर्व समाजबांधवांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे &lpar;संविधान वाचन&rpar; सामुदायिक पठण केले&period; लोकशाहीची मूल्ये&comma; समता&comma; बंधुता आणि न्याय जपण्याची शपथ यावेळी सर्वांनी घेतली&period; याप्रसंगी शहरातून भव्य रॅली काढण्यात आली&comma;<&sol;p>&NewLine;<p>कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व नागरिक आणि सैनिकांसाठी &&num;8216&semi;महाप्रसादा&&num;8217&semi;चे आयोजन करण्यात आले होते&period; या सोहळ्याला समता सैनिक दलाचे सर्व पदाधिकारी&comma; स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आणि भंडारा जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते&period; समता सैनिक दलाच्या चोख नियोजनामुळे आणि तरुणांच्या मोठ्या सहभागामुळे हा शौर्य दिन सोहळा अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version