मुंबई :- देखणा चेहरा, लुभावणारं हास्य आणि दमदार संवादफेक.. शोले, बंदिनी, हकीकत, मेरा कसूर क्या है, चुपके चुपके, ड्रीमगर्ल ते अगदी आत्ता आलेला रॉकी और रानी की प्रेमकहानी या चित्रपटापर्यं.संपूर्ण पडदा व्यापून टाकणारं भारदस्त व्यक्तिमत्व म्हणजे अभिनेते धर्मेंद्र देओल. बॉलिवूडचा हाँ देखणा हिरो अखेर आज काळाच्या पडद्याआड गेला. आज सकाळी मुंबईतील निवासस्थानी धर्मेंद्र यांनी अखेरचा श्वास घेतला.ते 89 वर्षांचे होते. तब्बल 65 वर्ष चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या धर्मेंद्र यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली असून सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहर हाही धर्मेंद्र यांच्या जाण्यामुळे शोकाकुल झाला असून त्याने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर धर्मेंद्र यांचा एक देखणा फोटो शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ‘एका युगाच अंत .. एक अतिशय मोठा, भव्य मेगास्टार..मेनस्ट्रीम सिनेमामधील हिरोची मूर्तीमंत व्याख्या, अतिशय देखणा हिरो.. ‘ अशा शब्दांत एक लांबलचक पोस्ट लिहीत करण जोहरने धर्मेंद्र यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करत त्यांच्या आठवणी जागवल्या आहेत.




