Home Latest News मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनाही झाला होता विरोध

मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनाही झाला होता विरोध

0
71
अरोली ग्रामपंचायतच्या अनियमितेच्या आरोपांची तालुक्यातील गावागावातील पान टपऱ्यांमध्ये चर्चेला उधाण, सरपंचा रोशनी प्रशांत भुरे यांची क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याशी होत आहे तुलना
किशोर साहू:मौदा,ता,१२ : सध्या जिल्हा परिषद शाळांची दिवसेंदिवस पटसंख्या कमी होत असून पटसंख्या अभावी शाळा बंद होण्याचे प्रमाण संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे. मात्र याला तालुक्यातील अरोली हे गाव अपवाद असून येथील जिल्हा परिषद शाळेतील पटसंख्या एका वर्षात अरोली सरपंच रोशनी प्रशांत भुरे यांनी त्यांच्या सहकारी व शाळेतील शिक्षक वृंदाच्या सहकार्याने एकाच वर्षात 25 ने वाढून आणि त्यातही शाळेतील एका शिक्षकाची नियुक्ती ग्रामपंचायत मार्फत करून गरिबांच्या जिल्हा परिषद शाळेला वाचविण्याच्या व गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्याच्या अथक प्रयास त्यांनी केला व करत आहेत. त्यांच्या या कामाची प्रशंसा तालुक्यातील गावा गावातील पान टपऱ्यांमध्ये होत असून त्यांनी केलेले हे कार्य क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सारखेच असल्याचे अनेक जण बोलून दाखवीत आहे. मुलींना शिक्षण देताना क्रांतीज्योती सावित्रीबाईंना जसा विरोध झाला त्याचप्रमाणे त्यांनाही विरोध होत आहे असेही अनेक शिक्षणप्रेमी बोलून दाखवीत आहे. त्यांच्यावर नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत ग्रामपंचायतीच्या विविध विकास कामात अनियमिततेचा आरोप ठेवून, त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी मागील आठ दिवसापासून रोजच आरोप प्रत्यारोप सुरू असून 9 सप्टेंबर पासून अरोली ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत सदस्य अमोल कुबडे हे त्यांचे सहकारी व समर्थकांसह पंचायत समिती मौदा समोर साखळी उपोषणावर बसलेले आहेत. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ह्या विरोध झुगारून मुलींना घडविले व ते त्यात यशस्वी पण झाल्या, आता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सारखे काम करणाऱ्या अरोलीच्या सरपंचा रोशनी प्रशांत भुरे ह्या यशस्वी होतात की अयशस्वी याकडे तालुका, जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले आहे.