spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

बुद्ध पार्क येथील जनतेच्या मागणीनंतर एक्स्पो २६ ऑक्टोबर पर्यंत वाढ

– महाबोधी महाविहाराचे दर्शनासाठी संधी

– ५६ फूट उंच महाबोधी महाविहाराच्या प्रतिकृतीला देशभरातून प्रतिसाद

नागपूर :- बुद्ध पार्क, बुद्ध नगर येथे सुरू असलेल्या महाबोधी महाविहार टेम्पल वर्ल्ड हेरिटेज एक्स्पो २०२६ ला देशभरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. येथील ५६ फूट उंच महाबोधी महाविहाराची भव्य प्रतिकृती नागरिकांचे प्रमुख आकर्षण ठरत असून, अनेक भाविक दर्शन घेताना भावुक होत आहेत. जनतेच्या वाढत्या प्रतिसादामुळे हा एक्स्पो आता २६ ऑक्टोबर पर्यंत वाढविण्यात आला आहे. बुद्ध पार्क, बुद्ध नगर, येथे सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत २६ ऑक्टोबर पर्यंत संधीचा लाभ घ्यावा. आयुष्यभर बोधगयेतील महाबोधी महाविहाराचे दर्शन घेण्याची इच्छा असूनही विविध कारणांमुळे तेथे जाता न आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना, महिला भगिनींना आणि भाविकांना नागपुरातच या भव्य प्रतिकृतीचे दर्शन घेण्याची संधी मिळत आहे. अनेक नागरिकांनी आनंदाश्रूंनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यामुळे हा एक्स्पो केवळ प्रदर्शन न राहता बुद्धांच्या विचारांशी जोडणारा भावनिक आणि प्रेरणादायी अनुभव ठरत आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून सम्राट अशोक यांच्या काळापासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक योगदानापर्यंतचा बौद्ध विचार, सामाजिक परिवर्तन आणि ऐतिहासिक वारसा जाणून घेण्याची संधी नागरिकांना मिळत आहे. विद्यार्थी, शाळकरी मुले, पालक आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने या एक्स्पोला भेट देत आहेत. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून रविवार, २५ ऑक्टोबर रोजी मोफत आरोग्य शिबिराचे केले आहे. या शिबिरात रक्तदान, सिकलसेल तपासणी, नेत्रतपासणी तसेच रक्तदाब आणि रक्तातील साखरेची तपासणी केली जाणार आहे. नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. आयोजक राकेश धारगावे यांनी सांगितले की, जनतेने या उपक्रमाला भरभरून प्रेम आणि सहकार्य दिले आहे. महाबोधी महाविहाराची प्रतिकृती पाहाताना नागरिकांच्या डोळ्यांत दिसणारे भावनिक अश्रू आणि चेहऱ्यावरील समाधान हे आयोजकांच्या मेहनतीचे सार्थक असल्याचे प्रतीक आहे. या उपक्रमाला प्रतिसाद देणाऱ्या सर्व नागरिकांचे त्यांनी आभार मानले. यावेळी छोटूभाऊ खांडेकर, मिथिलेश गाणार आणि अश्विन गणवीर उपस्थित होते. महाबोधी महाविहाराच्या भव्य प्रतिकृतीचे दर्शन घेण्यासाठी आणि बुद्धांच्या विचारांचा ऐतिहासिक वारसा जाणून घेण्यासाठी नागरिकांनी या एक्स्पोला आवर्जून भेट द्यावी, 26 ऑक्टोबर पर्यंत संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Popular Articles