spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नझुल जमिनींच्या विशेष अभय योजनेला मुदतवाढ: १ वर्ष अतिरिक्त वेळ

नागपूर २८ : नागपूर आणि अमरावती विभागातील निवासी वापरासाठी असलेल्या नझुल जमिनींसाठीची विशेष अभय योजना आता आणखी एक वर्षासाठी वाढवण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार, ही योजना १ ऑगस्ट २०२५ ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत सुरू राहील. त्यामुळे विविध कारणांमुळे यापूर्वी योजनेत सहभागी होऊ न शकलेल्या भाडेपट्टेदारांना आता यात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

योजनेचे स्वरूप:

ही योजना केवळ लिलावाद्वारे किंवा प्रीमियम भरून भाडेतत्त्वावर निवासी वापरासाठी दिलेल्या नझुल जमिनींना लागू आहे.

विभागीय आयुक्त, नागपूर यांच्या समितीने केलेल्या अभ्यासाच्या आधारावर हा निर्णय घेण्यात आला आहे.

ही मुदतवाढ संपल्यानंतर, म्हणजेच १ ऑगस्ट २०२६ पासून, २३ डिसेंबर २०१५ आणि २ मार्च २०१९ च्या मूळ शासन निर्णयातील नियम आणि अटी पुन्हा लागू होतील. यामुळे आता अनेक भाडेपट्टेदारांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

Popular Articles