spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

शेतकरी पुन्हा संकटात: पाण्याअभावी पावसाळी धान पिक धोक्यात

शेतीत कडक उन्हामुळे धान परे सुकण्याच्या मार्गावर

पेंच कालव्याचे पाणी सोडण्याची मागणी

सचिन चौरसिया, रामटेक १९ :- तालुक्यातील धान परे वाचवन्या करिता तसेच भात लागवडीसाठी पेंच कालव्यात पाणी सोडण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. दमदार पाऊस न आल्याने शेतकरी त्रस्त आहेत. तहसीलमध्ये १ जूनपासून ते आतापर्यंत ४५ दिवसांत ३७३ मिमी पाऊस पडला आहे. गेल्या १० दिवसांपासून पाऊस नाही आला. पारशिवनी, रामटेक, मौदा, कांद्री, भंडारा तहसीलमधील शेतकरी पेंच कालव्यावर अवलंबून आहेत. पेंच कालव्याद्वारे धान पिकाची ७० हजार हेक्टरपेक्षा जास्त जमीन सिंचनाखाली येते. पावसाच्या पाण्याने धान लागवडीची शक्यता नाही. १० दिवसांपासून पाऊस न पडल्याने भाताची रोपे सुकू लागली आहेत. भाताची रोपे वाचवून पुनर्लागवड करावी लागत आहे. पेंच कालव्याचे पाणी सोडल्यास शेतकरी भात लागवड सुरू करतील. भात लागवडीचे काम महिनाभर चालते. भात लागवडीसाठी मजुरांची मोठी कमतरता आहे. जर लवकर पाणी सोडले तर शेतकरी लागवड सहज करू शकतील. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन कीरपान, माजी  सभापती लक्ष्मण उमाळे आणि अनिल कोल्हे, प्रगतीशील शेतकरी भूषण घरजाडे आणि इतर शेतकऱ्यांनी २० जुलैपूर्वी पेंच कालव्याचे पाणी सोडण्याची मागणी केली आहे. तोतलाडोह, पेंच आणि खिंडसी जलाशयांमध्ये पुरेसे पाणी उपलब्ध आहे.

तोतलाडोह जलाशयांची स्थिती

तोतलाडोह जलाशयात ६१.५१ टक्के पाणीसाठा आहे. त्याची एकूण साठवण क्षमता ११६६ दलघमी आहे. कामठी खैरीमध्ये ८९.१५ टक्के पाणीसाठा आहे, ज्याची एकूण साठवण क्षमता १८० दलघमी आहे. खिंडसीमध्ये ५१ टक्के पाणीसाठा आहे, ज्याची एकूण साठवण क्षमता १०३ दलघमी आहे. सुदैवाने, जून २०२५ पूर्वी तलावांमध्ये ५० टक्के पाणीसाठा होता. या वर्षी फक्त १० टक्के पानीसाठा तलावांमध्ये साठवला गेला आहे


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.