spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

खून व दरोडा प्रकरणातील कुख्यात तडीपार आरोपी पांढरकवडा पोलीसांच्या ताब्यात

पांढरकवडा :- खून व दरोडा तसेच शस्त्र बाळगण्याच्या गंभीर गुन्ह्यातील आणि घटनेनंतर फरार असलेल्या कुख्यात तडीपार आरोपीला पांढरकवडा पोलिसांनी नागपूर शहरातून अटक करून ताब्यात घेतले आहे. गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ जून २०२६ रोजी आकीब बेग अहेफाज बेग मिर्झा वय २८, रा. मोमीनाबाद कॉलनी, पांढरकवडा यांच्या फिर्यादीवरून करण संजय शिंदे वय ३२, रा. ताडउमरी, ता. केळापूर याच्यासह एकूण सात आरोपींविरुद्ध पांढरकवडा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता बीएनएस तसेच फौजदारी कायदा आणि शस्त्र अधिनियमातील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेनंतर मुख्य आरोपी करण शिंदे हा फरार होता. पोलीस निरीक्षक एल. डी. तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पांढरकवडा पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने गोपनीय माहिती संकलित करून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा माग काढला. त्यानंतर नागपूर शहरातून त्याला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी पांढरकवडा येथे आणण्यात आले.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबीन बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत पोलीस निरीक्षक एल. डी. तावरे, पोलीस उपनिरीक्षक नितीन सुशीर, प्रमोद जुनुनकर, विलास जाधव, रजनीकांत पाटील, सुनील राठोड, सचिन काकडे आणि राजु मुत्तेलवार यांनी केली.

Popular Articles