spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अमोल इंडस्ट्रीजकडून जगदंबा संस्थानला दीड किलो चांदी अर्पण

नवरात्रोत्सवापूर्वी उर्वरित १५ ते २० किलो चांदी दान करण्याचे अध्यक्ष तथा विश्वस्तांचे आवाहन

पांढरकवडा येथील जगदंबा संस्थान केळापूर मध्ये अमोल इंडस्ट्रीज, यवतमाळ यांच्या वतीने जगदंबेच्या चरणी दीड किलो चांदी अर्पण करण्यात आली. यावेळी संस्थानच्या अध्यक्ष व विश्वस्तांनी देणगीदारांचे आभार मानले. यापूर्वीही मागील वर्षी जगदंबा संस्थानच्या गर्भगृहामध्ये अंदाजे ४५ ते ५० किलो चांदीचा वापर करून आकर्षक नक्षीकाम करण्यात आले होते. मात्र, गर्भगृहातील काही काम अद्याप अपूर्ण असून ते पूर्ण करण्यासाठी आणखी सुमारे १५ ते २० किलो चांदीची आवश्यकता असल्याची माहिती संस्थानच्या अध्यक्षांनी दिली.

येत्या नवरात्रोत्सवापूर्वी हे काम पूर्ण करण्याचा संस्थानचा मानस असून, यासाठी भाविक व दानशूर व्यक्तींनी चांदीचे दान करून सहकार्य करावे, असे आवाहन जगदंबा संस्थानच्या अध्यक्ष तथा विश्वस्त मंडळाने केले आहे. भाविकांच्या सहकार्यामुळे मंदिराच्या सौंदर्यात भर पडणार असून धार्मिक परंपरेचे जतन करण्यासही हातभार लागणार असल्याचे विश्वस्तांनी सांगितले

Popular Articles