spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अभियंता तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

सचिन चौरसिया,रामटेक :- तालुक्यातील शितलवाडी येथील रहिवासी तसेच जिल्हा परिषद पाणीपुरवठा उपविभागीय कार्यालयात कनिष्ठ अभियंता पदावर कार्यरत असलेले सौरभ पवार (वय २८) मानसिक छळ आणि त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवार (दि.२) सकाळी उघडी झाली. रामटेक पाणी पुरवठा उपविभागात कार्यरत असलेले कनिष्ठ अभियंता सौरभ धर्मराज पवार यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली असून, या घटनेमुळे सरकारी यंत्रणेत मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच रामटेक पोलिसांनी घाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय येथे पाठवण्यात आला. मृताच्या कुटुंबीयांनी उपविभागीय सहाय्यक अभियंता रत्नदीप रामटेके यांच्यावर मानसिक छळ, जातीय भेदभाव आणि कामाच्या ठिकाणी सातत्याने त्रास दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. मृताचे वडील तथा माजी नायब तहसीलदार धर्मराज पवार यांनी सांगितले की, सौरभ हा अत्यंत प्रामाणिक, कर्तव्यदक्ष आणि निष्ठेने काम करणारा अभियंता होता. कथित बोगस कामांना विरोध केल्यामुळे त्याचे वरिष्ठ अधिकारी रत्नदीप रामटेके यांच्याशी वारंवार वाद होत असल्याचा त्यांचा दावा आहे. त्यांच्या निधनामुळे कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली असून या प्रकरणी मृत्यूच्या कारणांच्या तपास रामटेक पोलीस करीत आहेत. तपासा दरम्यान सर्व बाबीची ताडणी करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार दोषींवर या प्रकरणाची निष्पक्ष, सखोल आणि उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, तसेच चौकशीत मानसिक छळ, जातीय भेदभाव किंवा आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितांवर अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा तसेच इतर लागू कायद्यांनुसार गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.

Popular Articles