spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

…. अखेर चाचेरच्या व्यायाम शाळेला मिळाले कुस्ती मॅट

– चाचेरच्या निवेदनकर्त्यांनी मानले पालकमंत्री तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार 

किशोर साहू, मौदा :- क्रिडांगण विकास अनुदान योजने अंतर्गत चाचेर येथील व्यायाम शाळेला कुस्ती मॅट मंजूर करण्यासाठी महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना चाचेर येथील ग्रामपंचायत पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी निवेदन दिले होते.

या निवेदनाची पालकमंत्र्यांनी तत्काळ दखल घेऊन जिल्हा क्रीडा अधिकारी, नागपूर यांच्यामार्फत मंजुरी दिल्याने सोमवार (1 जून) ला कुस्ती मॅट चाचेरच्या व्यायाम शाळेला मिळाल्याचे निवेदनकर्त्यांनी भ्रमणध्वनी वरून सांगितले. कुस्तीपटूंसाठी मॅटची मागणी करणाऱ्या निवेदनकर्त्यांमध्ये सरपंचा लुंबिनी महेश कलारे, ग्रामपंचायत सदस्य शैलेश कोपरकर, प्रकाश वाक्कलपूडी, भाजपा किसान आघाडी नागपूर जिल्हा ग्रामीण ( रामटेक) मंत्री विनोद कोपरकर ,सुरेंद्र टेंबरे, चंद्रकला धोटे, सुमन सोमकुवर,सविता जांभरे, नलू दरवई, रोशनी किरपान, ममता चौरे यांच्या समावेश आहे. सर्व निवेदनकर्ते व चाचेर ग्रामस्थांनी महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानले.

Popular Articles