spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

…. अखेर नऊ मीटर उंचीचे सोलर हायमास्ट लाईट मंजूर 

– भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष वीरेंद्र पायतोडे यांच्या प्रयत्नांना यश 

किशोर साहू, मौदा :- महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विशेष प्रयत्नाने महाऊर्जा अंतर्गत नानादेवी, सावरगाव, नवेगाव, कुंभापूर येथे नऊ मीटर उंचीचे सोलर हायमास्ट लाईट मंजूर करण्यात आले आहे.

याबाबत नागपूर जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चा चे उपाध्यक्ष तथा मौदा तालुका भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे सदस्य वीरेंद्र पायतोडे यांनी मंत्री बावनकुळे यांच्याकडे सतत पाठपुरावा केला होता. हायमास्ट लाईट मंजूर झाल्याबद्दल नानादेवी, सावरगाव ,नवेगाव ,कुंभापूर येथील ग्रामस्थांनी मंत्री बावनकुळे सह जिल्हा भाजयुमो उपाध्यक्ष वीरेंद्र पायतोडे यांचे आभार मानले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.