अखेर पाचव्या दिवशी प्रहार आंदोलन मागे रेल्वे पोलीस स्टेशन, ग्रामीण रुग्णालय मागणी होणार पुर्ण

0
70

तिरोडा :- तालुक्यातील मुंडीकोटा बाजार चौक येथे 12 ऑक्टोंबर पासून बेमुदत आमरण उपोषण प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रदीप निशाने यांचे सुरू होते. रेल्वे, पोलीस स्टेशन, ग्रामीण रुग्णालय, जलसिंचन, बँक, अशा विविध 14 मागण्याला धरून हे उपोषण सुरू होते. अखेर हे उपोषण पाचव्या दिवशी स्थगित करण्यात आले. ज्या मागण्याला धरून उपोषण सुरू होते त्या मागण्यांची तात्पुरती स्वरूपात लेखी निवेदन देऊ हे आंदोलन मागे घेण्यात आले. तिरोडा तालुक्याचे तहसीलदार एन.एम. ठाकरे यांनी उपोषण करते प्रदीप निशाने यांना लिंबू सरबत पाजून उपोषण सोडवले. यावेळी तिरोडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमित वानखेडे, टी. एच. ओ. नंदागवळी , वैद्यकीय अधिकारी पलास शहारे मुंडीकोटा ,नायब तहसीलदार श्रृंगपवार ,सहकार क्षेत्राचे अधिकारी, तसेच अन्य विभागाचे अधिकारी ,सह प्रहार जनसक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर ,प्रहार कार्यकर्ते वामन हजारे, सुरेंद्र सूर्यवंशी, रवी फुलझेले,जागेश्वर भांडारकर पंचायत समिती सदस्य वनिता भांडारकर, तिलक पारधी, प्रतिमा जैतवार सरपंच मुंडीकोटा, देवेंद्र मंडपे उपसरंपच, पोलिस पाटील महेंद्र भांडारकर, सह अन्य प्रहार चे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते ज्या मागण्या ला धरून मुदत उपोषण सुरू होते होते त्यांची पूर्तता जर नऊ डिसेंबर पर्यंत झाली नाही तर आणखी प्रहार तर्फे आंदोलन करण्यात येईल असे अशा इशारा प्रहार जनशक्ती पक्षातर्फे लेण्यात आले आहे.