spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

भाजप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सज्ज – माजी आ. रेड्डी

सचिन चौरसिया, प्रतिनिधी रामटेक :- येत्या काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (महापालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद) निवडणुका होणार असून, त्यासाठी भारतीय जनता पक्ष (भाजप) पूर्णपणे तयार असल्याचे माजी आमदार डी. मल्लिकार्जुन रेडी यांनी सांगितले आहे. रामटेक येथे पक्षाच्या किराड भवन येथील जनसंपर्क कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना रेड्डी म्हणाले, आमचा संघटनात्मक कार्यक्रम पूर्ण झाला आहे. आज निवडणुका लागल्या तरी आम्ही सज्ज आहोत.

रामटेक व कन्हान नगरपरिषद आणि कांद्री व पारशिवणी नगरपंचायतींमध्ये भारतीय जनता पार्टी अग्रेसर आहे. त्या ठिकाणी पक्षाचे अध्यक्ष व नगरसेवक निवडणुकीच्या रिंगणात उतरतील. मनसर, चाचेर, नगरधन, गोंडेगाव व टेकाडी जिल्हा परिषद सर्कलमध्ये भाजपाचा विद्यमान दावा कायम आहे. मात्र, इतर ठिकाणी मित्रपक्षांसोबतचा प्रस्ताव आल्यास वरिष्ठ पातळीवर ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत, डॉ. राजीव पोद्दार यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील निर्णय घेतले जातील. त्यानंतर विचार ठरेल,’ असे रेड्डी म्हणाले. या बैठकीला माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, रिंकेश चावरे (महामंत्री), माजी जिल्हा परिषद सदस्य सतीश डोंगरे, संजय मुलमुले, माजी नगराध्यक्ष दिलीप देशमुख, भाजपा महिला आघाडी नागपूर जिल्हा महामंत्री ज्योती कोल्लेपरा, माजी नगरपरिषद उपाध्यक्ष आलोक मानकर, ज्ञानेश्वर ढोक, व्यंकट कारमोरे, रजत गजभिये, रवी चौहान, विशाल कामदार, योगेश म्हात्रे, संजय बीसमोगरे तसेच सर्व माजी नगरसेवक नगरसेविका भाजपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

बॉक्स

 

नगराध्यक्ष पदासाठी तीन नावे चर्चेत

 

भाजपकडून रामटेक नगराध्यक्ष पदासाठीचा उमेदवार कोण असणार, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, मल्लिकार्जुन रेड्डी यांनी माजी नगरपरिषद उपाध्यक्ष आलोक मानकर, भाजपा महिला आघाडी जिल्हा महामंत्री ज्योती कोल्हेपरा आणि माजी नगराध्यक्ष दिलीप देशमुख ही नावे पुढे केली. तिन्ही उमेदवारांची छवी लोकांमध्ये स्वच्छ असली तरी, ऐन वेळेवर कुणाला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळणार, हे मात्र

गुपित आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.