तहसीलदार साहेब,आम्हाला न्याय द्या हो – सरपंच विजय खोडके

0
57

कामठी :- गेल्या काही दिवसांत नवनीत अल्ट्रालाईट कंपनीच्या जड वाहनांमुळे ग्रामपंचायत आडका अंतर्गत येणारा रस्ता हा पूर्णपणे खराब झाला आहे. वारंवार ग्रामपंचायत आडका कडून नवनीत अल्ट्रालाईट कंपनी ची व साईबाबा कन्ट्रक्सन कामठी यांची तक्रार कार्यकारी अभियंता तहसीलदार यांच्या कडे केल्या आहेत.

पण दुर्दैवाने आजतागायत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.

गावकऱ्यांना, शेतकऱ्यांना, शाळकरी मुलांना रोज या रस्त्यावरून ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात आज सरपंच विजय खोडके यांनी या रस्ता दुरावस्थेची पाहणी केली असता  पाहणीदरम्यान मुख्य अभियंता शालिनी कुठेमाटे, कनिष्ठ अभियंता परिमल चौधरी,सौ राखी झोरे पटवारी, उदयजी चांदुरकर ग्रामसेवक तसेच सरपंच विजय खोडके उपसरपंच रत्नाकर देऊळकर गावकरी विलास एडके लठारुजी चांभारे संतोषजी खोब्रागडे विशाल मानमोडे संजय देऊळकर चंद्रभान ठाकरे चक्रधर काकडे आणि शेतकरी बांधव उपस्थित होते.

सर्वांनी एकमुखाने मागणी केली की —

रस्त्यावर तात्काळ बॅरिकेड लावून जड वाहनांची वाहतूक बंद करावी

आणि कंपनीकडून रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करून घ्यावी

गावकऱ्यांचा आवाज हा माझा आवाज आहे.

जर या बाबीकडे दुर्लक्ष केले गेले, तर ग्रामपंचायत स्तरावरून कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कारण सरपंच विजय खोडके म्हणतात गावासाठी लढतोय, कारण गाव आमचं कुटुंब आहे तेव्हा तहसिलदार साहेब आम्हाला न्याय द्या हो अशी आर्त हाक निवेदनातून देत आहेत.