spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

….अखेर शिवसेना तालुकाप्रमुख प्रशांत भुरे यांच्या सतत पाठपुराव्याला यश

– कोरोना काळात कर्तव्य बजावत असताना मृत्यू पावलेल्या अरोली पोलीस पाटील मदनकर यांना 50 लाख रुपये मंजूर

– राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्या हस्ते आज दिले मंजुरीचे पत्र

किशोर साहू :- अरोली येथील पोलीस पाटील स्वर्ग. गजानन मदनकर यांना कोरोना काळात कर्तव्य बजावत असतानाच आपले प्राण गमवावे लागले, अशा कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाने 50 लाखांचे सानुग्रह अनुदान देण्याच्या निर्णय घेतला होता. राज्याचे राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी अनेक प्रयत्न करून त्यांना ही 50 लक्ष रुपयाची राशी मंजूर करून दिली. याबाबत शिवसेना मौदा तालुकाप्रमुख प्रशांत भुरे यांनीही राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्याकडे सतत पाठपुरावा केला होता, हे विशेष!. अखेर भुरे यांच्या सतत पाठपुराव्याला यश येऊन 50 लाख सानुग्रह अनुदानाचे पत्र आज शनिवार (ता. 1 ऑगस्ट) ला मदनकर यांच्या पत्नी वनमाला गजानन मदनकर, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्या हस्ते त्यांच्या रामटेक येथील कार्यालयात देण्यात आले. याप्रसंगी मंत्री जयस्वाल, तालुकाप्रमुख भुरे, अरोली सरपंच रोशनी प्रशांत भुरे, वनमाला मदनकर, सदाराम मदनकर, सामाजिक कार्यकर्ते गणेश बावनकुळे उपस्थित होते.

ही माहिती आज भुरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध ग्रुप वर शेअर केले असता, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल व शिवसेना मौदा तालुकाप्रमुख प्रशांत भुरे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला तर मदनकर यांच्या परिवाराने मंत्री जयस्वाल व तालुकाप्रमुख भुरे यांचे खूप खूप आभार मानले आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.