spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

विदर्भ व मराठवाडा येथील पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत 21 हजाराची आर्थिक मदत

किशोर साहू, मौदा,ता.३१:-  एनजीपी ॲग्रोटेक नागपूर यांनी विदर्भ आणि मराठवाडा विभागातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी साजरी व्हावी व शेतकऱ्यांबद्दल असलेली आपुलकी आणि मदतीचा एक हात म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत रु. 21000 (अक्षरी एकेविस हजार रुपये)इतकी आर्थिक मदत नुकतीच दिली. याप्रसंगी मुळगाव खंडाळा (गांगणेर) येथील कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. निशांत बरबटे यांनी राज्यमंत्री एडवोकेट आशिष जयस्वाल यांना धनादेशाचा चेक सुपूर्त केला.

यावेळी शिवसेना नेते वर्धराज पिल्ले, विकास झाडे , राहुल सोमनाथे , निखिल बरबटे आणि पार्थ बरबटे उपस्थित होते. या सामाजिक जाणिवेतून केलेल्या उपक्रमाबद्दल एनजीपी ऍग्रोटेक संस्थेचे राज्यमंत्री जयस्वाल यांनी मनःपूर्वक आभार मानले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.