रणाळा ग्रामपंचायत कार्यालयाला आग

0
37

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रणाळा ग्रामपंचायत कार्यालय ला आज दुपारी साडे तीन दरम्यान आग लागल्याची घटना घडली असून आग लागल्याचे कारण कळू शकले नसून आग लागल्याचे कारण शॉर्ट सर्किट सांगण्यात येते . मागील काही महिन्यांपासून माहिती अधिकारात मगितलेली माहिती कार्यालयाकडून देत नसून माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहे.त्यामुळे ही आग लागली की आग लागल्याचा बनाव करण्यात आला याबाबत नागरिकांत संभ्रम आहे. प्राप्त माहितीनुसार ग्रा प कार्यालय ला दुपारी तीन दरम्यान कुलूपबंद करण्यात आले होते. त्यानंतर अचानक कार्यालय ला आग लागल्याची घटना समोर आली बातमी हवेसारखी पोहोचताच कार्यालयीन कर्मचाऱ्यासह गावकऱ्यानी मदतीची धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला.दरम्यान नवीन कामठी पोलीस स्टेशन चे कर्मचारी तसेच अग्निशमन विभागाचे कर्मचाऱ्यांनी पोहोचून आग आटोकयात आणण्यात यश गाठले.ग्रा प कार्यालयातील किरकोळ साहित्याचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते.