spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कामठी शहरात पार्किंगच्या सुविधेअभावी वाहतुकीला अडथळा !

कामठी :- नागपूर शहर पोलीस आयुक्तालय परिमंडळ क्र 6 अंतर्गत येणारे कामठी शहर हे तालुक्याचे मुख्य व महत्वाचे केंद्र असून सद्यस्थितीत शहराला पार्किंग च्या भीषण समस्येने विळखा घातला आहे.शहरात हक्काच्या पार्किंग सुविधेचा अभाव असल्याने शहरातील मुख्य रस्ते आणि बाजारपेठेत वाहतुकीचा मोठा अडथळा निर्माण होत आहे याचा थेट त्रास सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी , महिला आणि बाजारात येणाऱ्या ग्राहकांना सहन करावा लागत आहे. तेव्हा कामठी नगर परिषद प्रशासनाने यावर तात्काळ तोडगा काढावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. कामठी शहरातील अस्ताव्यस्त वाहतुकीला आळा बसत लोकवस्तीतील जडवाहतुक बंदी व्हावी व नागरिकांना सोयीचे व्हावे या मुख्य उद्देशाने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या थेट निदर्शनातुन तत्कालीन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या अधिसूचनेनुसार शहरातील 7 मार्गावर सकाळी 9 ते दुपारी 1 व दुपारी 3 ते रात्री साडे सात वाजेदरम्यान जडवाहतुकीस प्रतिबंध शिवाय कामठी शहरातील 8 स्थळी पार्किंग व 3 स्थळी नो पार्किंग झोन निर्माण करण्याच्या आदेशितावरून नगर परिषद च्या वतीने पार्किंग , नो पार्किंग चे फलक सुद्धा लावण्यात आले आहेत तसेच जडवाहतुकीस प्रतिबंध असलेल्या ठिकाणी तशी सोय सुद्धा करण्यात आली आहे मात्र यासंदर्भात स्थानिक पोलीस विभागाच्या अत्यंत वर्दळीच्या परिसरात अस्ताव्यस्त वाहतुकीला बळ मिळत असल्याने नागरिकांना नाहक डोकेदुखीचा त्रास भोगावा लागत आहे परिणामी शहरातील पार्किंग व नो पार्किंग ची व्यवस्था अजूनही वाऱ्यावर आहे. गोयल टाकीज चौक ते पोलीस स्टेशन रोड पर्यंत अजूनही फेरीवाले अतिक्रमण करून दुकाने थाटली आहेत त्यामुळे बाजार परिसरात पुन्हा एकदा वाहतूक खोळंबल्याचा व पार्किंग चा प्रश्न ऐरणीवर आल्याचे चित्र दिसून येत आहे.रस्त्याच्या दोन्ही बाजूने चक्क अतिक्रमण धारक वसलेले असल्याने याचा नाहक त्रास आता नागरीकाना भोगावा लागत आहे.

कामठी शहराचा पुढील 20 वर्षाचा विचार करीत तयार करण्यात आलेल्या प्रारूप विकास आराखड्या नुसार निर्देशित केलेले पार्किंग नो पार्किंग झोन नुसार पोलीस क्वार्टर टी पॉईंट चौक ते शिवाजी पुतळा चौक , नगर परिषद जुना नका क्र 5 ते वारीसपुरा कडे जाणारा रस्ता, जी एन रोड ते शिव पंचायत मंदिर रस्ता, शहीद स्मारक चौक ते दमडू महाराज चौक, मोटर स्टँड चौक ते भाजीमंडी पूल, कोचर बंगला ते राममंदिर मोदी शाळेकडे जाणारा रस्ता,जे एन रोड प्रबुद्धनगर चर्च ते दरोगा मस्जिद कडे जाणारा रस्ता या सात मुख्य रस्त्यावर सकाळी 9 ते दुपारी 1 व दुपारी 3 ते सायंकाळी साडे सात पर्यंत जडवाहतुकीस प्रतिबंध राहणार आहे तसेच 8 ठिकाणी असलेल्या पार्किंग झोन नुसार मिनी ट्रक, कार इत्यादी वाहने उभी करण्यासाठी रुईगंज मैदान येथील खरेदी -विक्री सोसायटीला लागून असलेला परिसर , मोठ्या वाहनांसाठी जुना नाका क्र 1 जवळील परिसर, तसेच खुले नाट्यगृह , बैलबाजार व त्याबाजूची जागा, ऑटो स्टँड व छोटी वाहनासाठी पासीपुरा मैदान , ऑटोस्टॅण्ड करिता जुना नाका क्र 5 जवळील मोकळी जागा , दुचाकी वाहने व कारसाठी गांधीमंच समोरील जागा तसेच राजू चाटवाले यांच्या दुकानासमोरील जागा , ट्रक व कार तसेच इत्यादी वाहनासाठी आययुडीपी एरिया जागेतील शासकीय मोकळी जागा निश्चित करण्यात आली आहे तसेच 3ठिकानावरील नो पार्किंग साठी शहीद स्मारक ते दमडू चौक , मेंनरोड मोटर स्टँड चौक ते भाजीमंडी पूल , सरदार वल्लभभाई पटेल चौक ते डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या पर्यंत ची जागा निश्चिती करण्यात आलेली आहे.यासंदर्भात स्थानिक प्रशासनासह जनजागृती सह तशी सोय सुद्धा करण्यात आली आहे मात्र बेशिस्त वाहतूक दारांच्या वतिने नियमाला बगल देत असल्याने शहरातील पार्किंग व नो पार्किंग चा प्रश्न वाऱ्यावर असल्याचे दिसून येते ज्याकडे पोलीस विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष आहे.

कामठी शहराचा वाढता विस्तार आणि वाहनांची संख्या लक्षात घेता प्रशासनाने आतातरी कुंभकर्णी झोपेतून जागे व्हावे आणि पार्किंगच्या सुविधेसाठी ठोस पावले उचलावीत अशी मागणी सर्वस्तरातून अत्यन्त तीव्रतेने केली जात आहे आता यावर कामठी नगर परिषद प्रशासन कोणते ठोस पावले उचलते यावर संपूर्ण कामठी वासीयांचे लक्ष लागले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.