spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

‘स्वप्न निकेतन’ सोसायटीत प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘ध्वजारोहण’ सोहळा उत्साहात संपन्न

नागपूर :- स्वप्न निकेतन सोसायटीच्या प्रांगणात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात, देशभक्तीपूर्ण वातावरणात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. सकाळी आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यास सोसायटीतील रहिवासी तसेच परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जवळपास ३०० नागरिकांच्या साक्षीने हा कार्यक्रम दिमाखात संपन्न झाला.

ध्वजारोहणाचा मान अॅड. संतोष चव्हाण (वरिष्ठ अधिवक्ता, जिल्हा सत्र व उच्च न्यायालय) यांच्या हस्ते करण्यात आला. त्यांच्या हस्ते तिरंगा फडकावल्यानंतर उपस्थितांनी राष्ट्रगीत गायन करून देशप्रेमाची भावना व्यक्त केली. कार्यक्रमास अब्दुल सफिक सानी यांची प्रमुख उपस्थिती लाभली, तर विजय गेडाम यांनी विशेष उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढविली.

आपल्या मार्गदर्शनपर विचारांमधून मान्यवरांनी संविधानाचे महत्त्व, राष्ट्रीय एकात्मता आणि नागरिकांची कर्तव्ये याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. संपूर्ण कार्यक्रमात देशभक्तीपर घोषणांनी आणि सकारात्मक वातावरणाने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विकास शेंडे, कुंदन (लारा), आरिफ शेख, विवेक वाघमारे, अतिश ठाकरे, दीपक सेंगरे, बंडू आदमने, निलेश रक्षक, शिल्पा कांबळे, सोनल वाघमारे, आम्रपाली बागडे, प्रकाश गेडाम, रवी नानने, कुलदीप दवंडे, अमोल सोनटक्के, सिद्धार्थ साखरे, शिल्पा खरवडे आणि टीना वासनिक यांनी मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या सक्रिय सहभागामुळे कार्यक्रम सुरळीत आणि यशस्वीपणे पार पडला.

Popular Articles