spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

खुमारीमध्ये ५.५३ लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त

– एक आरोपी जेरबंद तर दुसरा फरार

सचिन चौरसिया,प्रतिनिधी रामटेक :- राज्य शासनाने बंदी घातलेल्या सुगंधित तंबाखू आणि गुटख्याच्या काळ्याबाजारावर रामटेक पोलिसांनी सर्जिकल स्ट्राईक केला आहे. सुगंधी तंबाखूच्या साठय़ावर शासनाने बंदी घालूनही त्याची विक्री सुरू असल्याची अन्न व औषध प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून ५ लक्ष ५३ हजार ६५० रुपये किमतीचा सुगंधी तंबाखूचा साठा जप्त केला आहे.

गुप्त माहितीच्या आधारे टाकला छापा

मंगळवार (दि.२४) फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ही धडक कारवाई करण्यात आली. नागपूर-जबलपूर महामार्गावर मौजा खुमारी गावातील शेतातील एका घरामध्ये प्रतिबंधित सुगंधी तंबाखूच्या साठा व व्यवसाय करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून धाड टाकली असता, साठवणूक केलेला सुगंधित तंबाखूचा मोठा साठा हस्तगत करण्यात आला.

मोठा मुद्देमाल हस्तगत

पोलिसांनी केलेल्या या कारवाईत ३०० किलो सुगंधी तंबाखू, तीन पॅकिंग मशीन तसेच प्लास्टिक व कागदी पॅकिंग साहित्य असा एकूण ५ लक्ष ५३ हजार ६५० रुपयेचा मुद्देमाल जप्त केला आहे. अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन करून मानवी आरोग्यास घातक ठरणारा हा साठा विक्रीसाठी आणण्यात आला होता.

एक आरोपी जेरबंद तर दुसरा फरार

याप्रकरणी पोलिसांनी शेत मालक प्रकाश कामडे (वय ४५ रा. खुमारी) ताब्यात घेतले असून दुसरा आरोपी आशिष रोकडे (रा.नागपूर) हा फरार आहे. त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस ) आणि अन्न सुरक्षा व अप.क. १९६/२०२६ कलम १२३, २७४, २७५, २२३ बि. एन.एस. सहकलम २६(१), २६ (२) (आयव्ही), २७ (३) (ई), ३० (२) (अ), ३(१) (झेडझेड) (आयव्ही), ५९ अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ अन्वये नोंद करून गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली कारवाई

पोलीस निरीक्षक अरविंदकुमार कतलाम, पोलीस उपनिरीक्षक हरिश्चंद्र मोरे, पोलीस उपनिरीक्षक आरती नरोटे, एएसआय केसरे, पो.हवा. प्रफुल रंधई, पोना. उमेश गाढवे, पो.शी. अतिश गाढवे, पो.शी. शरद गीते, पो.शी. मनोज लांजेवार यांच्या पथकाने ही संयुक्त कामगिरी फत्ते केली. या कारवाईमुळे अवैध गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. प्रतिबंधित तंबाखू विक्री व साठवणुकी विरोधात कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्राकडून सांगण्यात आले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.